Chandrapur : जास्त मूल्यांकन करून कर्जवाटप, स्टेट बँकेतील तीन अधिकाऱ्यांना अटक, आणखी कुणाकुणावर कारवाई?

चंद्रपुरात मालमत्तेचं जास्त मूल्यांकन करून कर्ज वाटप केल्या प्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांसह पंधरा जणांना अटक करण्यात आली. चंद्रपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अटक झालेल्यांमध्ये एका एजंटसह अकरा मालमत्ता धारकांचा समावेश आहे.

Chandrapur : जास्त मूल्यांकन करून कर्जवाटप, स्टेट बँकेतील तीन अधिकाऱ्यांना अटक, आणखी कुणाकुणावर कारवाई?
चंद्रपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे कार्यालय. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 1:06 PM

चंद्रपूर : मालमत्तेचं जास्त मूल्यांकन करून कर्ज वाटप केल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) तीन अधिकाऱ्यांसह पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे. चंद्रपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Financial Crime Branch) ही कारवाई केली आहे. अटक झालेल्यांमध्ये शाखा व्यवस्थापक देविदास कुळकर्णी, कर्ज प्रक्रिया अधिकारी विनोद लाटेलवार आणि पंकजसिंह सोलंकी यांचा समावेश आहे. या सोबतच गणेश नैताम या एजंट सह अकरा मालमत्ता धारकांना देखील अटक करण्यात आली आहे. बँकेच्या या फसवणूक प्रकरणात आरोपींनी बनावट आयकर रिटर्न तयार करून आणि मालमत्तांचे जास्त मूल्यांकन दाखवून 44 प्रकारणांमध्ये 14 कोटी 26 लाखांचे कर्जवाटप केले होते. मात्र हे सर्व कर्ज NPA झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड (Rajiv Kakkad) यांनी 2 वर्षाआधी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती.

14 कोटी रुपयांचे कर्ज झाले एनपीए

या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात आली. मुख्य म्हणजे ज्या लोकांना हे कर्ज देण्यात आले ते कर्जदार अतिशय गरीब आणि सर्वसामान्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या लोकांचे खोटे आयकर रिटर्न तयार करून त्यांच्या नावे काही मोठ्या प्रॉपर्टी डीलर्सनी कर्जाची ही रक्कम हडप केल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात बँकेचे आणखी काही अधिकारी आणि प्रॉपर्टी डीलर्स यांना देखील अटक होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक शेखर देशमुख यांनी ही माहिती दिली. या मोठ्या कारवाईने चंद्रपूरच्या बिल्डर वर्तुळात खळबळ उडाली आहे. सर्व कर्ज NPA झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहाराध्यक्षाने तक्रार केली होती. दोन वर्षाआधी केंद्रीय वित्तमंत्री यांच्याकडे तक्रारीच्या आधारावर चौकशी झाली. या प्रकरणात बँकेचे आणखी काही अधिकारी आणि प्रॉपर्टी डीलर यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यांना झाली अटक

अटक करण्यात आलेल्यांमध्ये ‍वेता महेश रामटेके, वंदना विजयकुमार बोरकर, योजना शरद तिरणकर, शालिनी मनीष रामटेके, मनीष बलदेव रामटेके, मनीषा विशाल बोरकर, वृंदा कवडू आत्राम, राहुल विनय रॉय, गजानन दिवाकर बंडावार, राकेशकुमार रामकरण सिंग, गणेश देवराव नैताम, गीता गंगादिन जागेट, पंकजसिंह किशोरसिंह सोलंकी, विनोद केशवराव लाटेलवार, देवीदास श्रीनिवासराव कुळकणी यांचा समावेश आहे.

Nagpur | कोमात असताना प्रसूती, मेंदूवर शस्त्रक्रिया! डॉक्टरांनी वाचविले आईसह बाळाचे प्राण

आधी सरण रचले, पूजा केली नंतर स्वतःला जाळून घेतले, नागपुरात वृद्ध व्यक्तीनं असं का केलं?

पित्याची आत्महत्या, तीन दिवसांनी मुलीच्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली, एकाला अटक

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.