Akola Bachchu Kadu | अकोल्यात बच्चू कडू यांचे श्रमदानातून दुःख व्यक्त! प्रा. पुंडकर यांना डिवचलं

विदर्भात सध्या सूर्य चांगलाच कोपला. रखरखतं उन्ह आहे. अशावेळी मजुरांसोबत काम करून बच्चू कडू यांनी विरोध करणाऱ्यांना प्रत्यूतर दिलं.

Akola Bachchu Kadu | अकोल्यात बच्चू कडू यांचे श्रमदानातून दुःख व्यक्त! प्रा. पुंडकर यांना डिवचलं
अकोल्यात बच्चू कडू यांचे श्रमदानातून दुःख व्यक्तImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 11:11 AM

अकोला : बच्चुभाऊ कडू यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) धर्यवर्धन पुंडकर (Dharyawan Pundkar) यांनी आरोप करून खोटे गुन्हे दाखल केले. यावर बच्चुभाऊ कडू यांना अटकपूर्व जामीन सुद्धा मिळाला. त्यामुळे आज बच्चु कडू यांनी डाबकी रोड स्थित कॅनॉल (Canal Road on Dabki Road ) जवळील रस्ता बांधणीच्या कामांमध्ये श्रमदान करून झालेल्या बदनामीसाठी दुःख व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. धर्यवर्धन पुंडकर यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी व शाहनिशा न करता असे आरोप करणे बिनबुडाचे आहेत. उलट त्यांनीच जाती-धर्माच्या नावावर राजकारण करून आणि दलित वस्तीच्या पैश्यांमध्ये अपहार करून पैसा कमविला आहे, असा आरोपही बच्चुभाऊ कडू यांनी यावेळी केला. अकोल्यात काल 45 डिग्री तापमान होते. तरीही बच्चू कडू यांनी याची तमा बाळगली नाही. डोक्याला रुमाल बांधली. हातात घमेला घेतला. मजुरांसोबत काम केलं.

कुठलीही 420 झाली नाही

यावेळी सोबत नितीन देशमुख हे सुद्धा श्रमदानासाठी उपस्थित होते. त्यांनीसुद्धा वंचित बहुजन आघाडीचे खोट्या आरोपावर श्रमदानातून दुःख व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, आम्ही कुठल्याही प्रकारचा तीळमात्रही पैशाचा व कामाचा अपहार केला नाही. ज्या ठिकाणी रस्ते नव्हते त्या ठिकाणी हा मान्य झालेला पैसा वळविण्यात आला. गावांमधील रस्ते नसल्याचे स्पष्ट झाल्यावर स्वतः बच्चुभाऊ कडू यांनी हा पैसा वगळता करून शेतकऱ्यांसाठी रस्त्याची बांधणी केली. त्यामुळे यामध्ये कुठलीही 420 झाली नाही.

रखरखत्या उन्हात श्रमदान

खोट्या सह्या करून किंवा खोटे दस्तावेज दाखवून पैशाचा अपहार केला जातो. परंतु, हा पैसा वगळता करून ग्रामीण रस्ते बांधून यामध्ये कुठलाही अपहार होऊ शकत नाही. त्यामुळे बच्चू कडू यांनी यावेळी न्यायालयीन प्रकरणांमध्ये न्याय न मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचेही मत व्यक्त केले. परंतु, झालेल्या या बदनामीसाठी काल त्यांनी अकोला येथील डाबकी रोड वरील कॅनाल रस्त्याचे बांधकाम मध्ये स्वतः श्रमदान करून आपले दुःख व्यक्त केले. विदर्भात सध्या सूर्य चांगलाच कोपला. रखरखतं उन्ह आहे. अशावेळी मजुरांसोबत काम करून बच्चू कडू यांनी विरोध करणाऱ्यांना प्रत्यूतर दिलं.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.