खरिपाची तयारी पूर्ण, पावसाची प्रतीक्षा केव्हा संपेल?, मान्सूनला सात दिवस उशीर

| Updated on: Jun 12, 2023 | 5:06 PM

र्व विदर्भातील मुख्य पीक म्हणून धानाकडे पाहिले जाते. लावणी झाली की काही ना काही प्रमाणात धान होतोय. त्यामुळे कमी मेहनतीत चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून धानाकडे पाहिले जाते.

खरिपाची तयारी पूर्ण, पावसाची प्रतीक्षा केव्हा संपेल?, मान्सूनला सात दिवस उशीर
Follow us on

निलेश डाहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर : पूर्व विदर्भातील मुख्य पीक म्हणून धानाकडे पाहिले जाते. लावणी झाली की काही ना काही प्रमाणात धान होतोय. त्यामुळे कमी मेहनतीत चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून धानाकडे पाहिले जाते. धानाच्या पेरणीसाठी आवश्यक असते ते पाऊस. बहुधा ७ जूनला विदर्भात मान्सूनचे आगमन होते. परंतु, आता सहा दिवस उशीर झाला तरी अद्याप मान्सून बरसला नाही. त्यामुळे मान्सूनचा पाऊस केव्हा पडेल, याची प्रतीक्षा शेतकरी करत आहे. चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. यासाठी दमदार पावसाची गरज असते. यंदा मान्सूनचे आगमन अपेक्षेनुसार झाले नसल्याने पेरणी खोळंबली आहे. तथापि, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी पूर्ण केली आहे. आता वाट आहे ती पावसाची

मशागत झाली, पावसाची प्रतीक्षा

मागील दोन-तीन वर्षे कोरोनाच्या सावटात गेली. त्यानंतर आता पहिल्यांदाच बळीराजा मुक्तपणे शेतीच्या नव्या हंगामाच्या तयारीत व्यस्त झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 7 जून रोजी मान्सूनचे आगमन होत असते. मात्र सध्यातरी चंद्रपुरात मान्सून दाखल झालेला नाही. मात्र शेतकरी वर्गाने आपल्या शेतजमिनीची मशागत करून उत्तम पावसाची वाट पाहात चांगल्या हंगामाची अपेक्षा ठेवली आहे.

 

हे सुद्धा वाचा

बियाणे, खतांची जुळवाजुळव

चंद्रपूर जिल्ह्यात मुख्यत्वे धान -सोयाबीन -कापूस या पिकांचे क्षेत्र अधिक आहे. म्हणूनच शेतकरी सध्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने पेरणीला प्रारंभ होणार आहे. यासाठी बियाण्यांची आणि खतांची जुळवाजुळव शेतकऱ्यांनी केली आहे. आता वाट आहे ती पावसाची.

यावर्षी कृषी विभागाने पाच लाख हेक्टर लागवडीचे क्षेत्र निर्धारित केले आहे. यात भात आणि कापसाचे क्षेत्र सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी 38 टक्के, तर सोयाबीन क्षेत्र 15 टक्के आहे. तुरीचे क्षेत्र 8 टक्के राहणार आहे. बियाण्यांचा सुमारे 90 टक्के पुरवठा करण्यात आला आहे. बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी भरारी पथके तैनात केली आहेत. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.

शेतशिवार तयार करून उत्तम पाऊस आणि भरघोस उत्पादनाची प्रतीक्षा शेतकरी करत आङे. शेतकऱ्याच्या नशिबी नक्की काय वाढून ठेवले आहे, हे येणारा काळ सांगणार आहे.