रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी ‘धोंडी धोंडी पाणी दे…’ म्हणत शेतकऱ्यांचं साकडं….!
अकोला जिल्हासह वाडेगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक जण 'मुसळधार पाऊस बरसू दे आणि शेतकऱ्याचं रान हिरवंगार होऊ दे', अशी प्रार्थना परमेश्वराकडे करत आहेत.
अकोला : जिल्हासह वाडेगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक जण ‘मुसळधार पाऊस बरसू दे आणि शेतकऱ्याचं रान हिरवंगार होऊ दे’, अशी प्रार्थना परमेश्वराकडे करत आहेत. तर काहींनी धोंडी धोंडी पाणी दे म्हणत वरुणराजाला साकडं घालत आहेत. (Farmers of Akola district pray to God for rain)
पावसाची दडी, पिकांची शेवटची घटका
गेल्या अनेक वर्षापासून अवेळी आणि अपुऱ्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांला नापिकीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी कमालीचा धास्तावला आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी तरी बऱ्यापैकी पाऊस होईल या आशेने बी-बियायाणे व खताची जुळवाजुळव केली. पावसानेही थोड्या प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकरी पेरते झाले होते. मात्र पेरणी केलेली पिके बऱ्यापैकी अंकुरले असतानाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने पिके शेवटची घटका मोजतांना दिसत आहेत.
रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी ‘धोंडी धोंडी पाणी दे…’
त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत दिसत आहे. दरम्यान वाडेगावसह परिसरात पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळावे याकरिता रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी ‘धोंडी धोंडी पाणी दे’ म्हणत वरुणराजाला साकडं घातलं जात आहे.
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
मान्सूनच्या पावसानं महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हजेरी लावली. मात्र, नंतर पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यानं काही ठिकाणच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. कर काही ठिकाणी मात्र पावसाअभावी पिकं शेवटच्या घटका मोजत आहेत. पावसाअभावी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे.
शेतकरी हवालदिल
पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालं आहे. पाऊस नसल्यामुळे लाखो शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊस नसल्याने काही शेतकऱ्यांना पेरता येईना तर काहींना पिकं जळून जाण्याची भीती आहे.
(Farmers of Akola district pray to God for rain)
हे ही वाचा :
मराठवाडा दुष्काळाच्या छायेत, लाखो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट