… तेव्हाच पेरणीला सुरुवात करा; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला
खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत, असेही कृषी विभागाने सांगितले आहे.
वर्धा: राज्यभरात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कृषी विभागाने वर्ध्यातील शेतकऱ्यांना (Farmers) एक महत्वाची सूचना केली आहे. शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे. (Don’t start sowing activity till sufficeint rain agriculutre department adivce to farmers)
अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80 ते 100 मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे, आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. तसेच खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत, असेही कृषी विभागाने सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वीच कृषी विभागाने नागपुरातील शेतकऱ्यांनाही पेरणीची घाई न करण्याचा सल्ला दिला होता. राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीसाठी तयारी सुरु केली होती. मात्र, हवामान खात्याने नागपुरात जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला होता. या कालावधीत बियाणांची पेरणी करु नये, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले होते. घाईघाईने बियाणे पेरल्यास ते वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी काही काळ धीर धरावा, अशी सूचना कृषी खात्याने दिली होती.
संबंधित बातम्या:
Bhendwal Bhavishyavani : पाऊस भरपूर पण पीक साधारण, राजा कायम पण ताण वाढेल, भेंडवळची भविष्यवाणी
Mumbai Rain Live Updates | महाराष्ट्रातील पावसाचे लेटेस्ट अपडेट
(Don’t start sowing activity till sufficeint rain agriculutre department adivce to farmers)