Sangli Suicide : सांगलीत सासरच्या जाचाला कंटाळून विहितेची आत्महत्या, विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन

वर्ष 2017 पासून शारिरीक व मानसिक त्रास होत असल्याचे व पती प्रमोद पाटील यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी तातडीने कारवाई केली. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह सासरच्या मंडळींच्या ताब्यात न देता माहेरकडील लोकांनी ताब्यात घेतला.

Sangli Suicide : सांगलीत सासरच्या जाचाला कंटाळून विहितेची आत्महत्या, विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन
सांगलीत सासरच्या जाचाला कंटाळून विहितेची आत्महत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 9:16 PM

सांगली : पतीचे असलेले अनैतिक संबंध (Illegal Relation) व माहेरहून सोने पैसे आणण्याचा शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने विहीरीत उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना सांगलीतील आगळगाव घडली आहे. याप्रकरणी पती,सासू,सासरे व नणंद या चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती व सासरे या दोघांना अटक (Arrest) केली आहे. विवाहित महिलेने शनिवारी शेतातील सामुदायिक विहीरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. त्यानंतर रविवारी विहीरीत मृतदेह सापडला. अंकिता प्रमोद पाटील असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे.

माहेरुन दोन तोळे आणि रोख 50 हजारासाठी महिलेचा छळ

विवाहितेचे वडील अनिल भागवत पवार रा. संजयनगर, सांगली यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आगळगाव येथील गावाच्या पश्चिमेकडील बाजूला पाटील वस्ती आहे. वर्ष 2016 मध्ये अंकिता हिचा विवाह प्रमोद पाटील यांच्याबरोबर झाला आहे. यांना एक मुलगा आहे. विवाहानंतर एक वर्ष चांगले गेले. त्रास वगेरे काही होत नव्हता. परंतु त्यानंतर माहेरहून दोन तोळे सोने व रोख 50 हजार रुपये घेवून ये. तसेच विवाहितेला स्वयंपाक व्यवस्थित येत नाही, या कारणावरून सासरच्या मंडळींकडून वारंवार शारिरीक आणि मानसिक त्रास होत असल्याचे वडील पवार यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

वर्ष 2017 पासून शारिरीक व मानसिक त्रास होत असल्याचे व पती प्रमोद पाटील यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी तातडीने कारवाई केली. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह सासरच्या मंडळींच्या ताब्यात न देता माहेरकडील लोकांनी ताब्यात घेतला. त्यानंतर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Fed up with domestic violence, the woman committed suicide by jumping into a well)

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.