Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हरविलेला कुत्रा शोधा नि 50 हजार रुपये कमवा! एकीकडं श्वानप्रेम, तर दुसरीकडं तिरस्कार का?

नागपुरात नेहमी कुत्रा भुंकतो म्हणून त्याला साखळीनं रस्त्याच्या मधोमध बांधले. कुत्रा वाहनाखाली दबून मरावा, अशी कुत्र्याचा तिरस्कार करण्यांची इच्छा होती. तर, दुसरीकडं चंद्रपुरात लॅबराडोर जातीचा कुत्रा हरविला आहे. याची माहिती देणाऱ्यास मोठी रक्कम मिळणार आहे. कुत्रा शोधून देणाऱ्यास तब्बल 50 हजार रुपयांचे घवघवित पारितोषिक ठेवण्यात आलंय.

हरविलेला कुत्रा शोधा नि 50 हजार रुपये कमवा! एकीकडं श्वानप्रेम, तर दुसरीकडं तिरस्कार का?
चंद्रपुरात हरविलेला कुत्रा शोधण्यासाठी मोठं बक्षीस ठेवण्यात आलंय. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 4:49 PM

चंद्रपूर : चंद्रपुरात हरविलेल्या कुत्र्याला शोधण्यासाठी पन्नास हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर (Social Media) जाहिरातबाजी केली. जोरू नावाचा दोन वर्षे वयाचा कुत्रा आहे. त्याची हाईट तीन ते साडेतीन फूट आहे. 24 फेब्रुवारीपासून तो हरविला आहे. तो लॅबराडोर मिक्स जातीचा गोल्डन कलरचा (Labrador Mix Breed Golden Color) आहे. रमाला तलाव, गंजवार्ड, भानापेठ, पटेल हायस्कूल, कस्तुरबा चौक, बगड खिडकी, मोहतावाडी, श्रीराम वार्ड, ताडबन कोष्टी मोहल्ला, कन्नमवार चौक या भागातून त्याला चोरून नेण्यात आले. यासंदर्भात कुणाला माहिती मिळाल्यास त्यांनी डॉ. दिलीप कांबळे (Dr. Dilip Kamble), प्रतीभा कांबळे यांच्याशी संपर्क साधावा. चंद्रपुरातील रमाला तलावासमोरील कांशी सी टी स्कॅन अँड एमआरआय सेंटर येथे संपर्क साधावा, यासाठी त्यांनी आपले मोबाईल क्रमांकही दिले आहेत.

dog 2

पहिला घटना…

तर दुसरीकडं, नागपुरात कुत्र्याचे वारंवार भूंकणे चांगलेच जिव्हारी लागले. त्यामुळं काही समाजकंटकांनी त्याला रस्त्याच्या मधोमध बांधून ठेवले. रस्त्याच्या मध्ये बांधून ठेवल्याने त्याचा मृत्यू होईल, असा त्यांचा समज होता. पण, कुत्र्याचे दैव बलवत्तर म्हणून तो बचावला. ही घटना वर्धा मार्गावर घडली. सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनची कार्यकर्ती रस्त्याने जात होती. तिला कुत्रा साखळीने बांधलेल्या अवस्थेत दिसला. हा कुत्रा आमच्याच वस्तीतील असून तो नेहमी भुंकत राहतो म्हणून त्याला बांधून ठेवल्याचं स्थानिकांचं म्हणण होतं. संस्थेच्या संचालिका स्मिता मोरे यांना तर हा कुत्रा आमच्या भागात नको अन्यथा आम्ही त्याला मारून टाकू, अशी धमकीच दिली. कुत्राची सुटका झाल्यानंतर तो पळून गेला.

दुसरी घटना…

नागपुरात भटक्या कुत्र्यांनी एका महिलेला जखमी केल्याची घटना काल घडलीय. सुमित्रा ठाकरे असं जखमी महिलेचं नाव आहे. वाठोडा येथील राधाकृष्णनगरात त्या राहतात. त्यांच्यावर अचानक बेवारस कुत्र्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात सुमित्रा ठाकरे गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. महापालिका प्रशासनाने बेवारस कुत्र्यांना पकडावे आणि त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केल्याचं संजय काळे यांनी सांगितलं.

Video – Nagpur | प्रभाग रचनेची काम पुन्हा राज्याकडे येणार? विजय वडेट्टीवार यांनी नेमकं काय सांगितलं

वर्ध्यातील शेतकरी महिला जिल्हाधिकारी कार्यालयात जप्तीसाठी येते तेव्हा… कशी उडते कार्यालयात धांदल?

भंडाऱ्यात काम न करताच पैशांची उचल, पांदण रस्ते गायब! महालगाव ग्रामपंचायतीचा गैरकारभार?

सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.