Eknath Shinde : बोगसगिरी थांबवा, कायम उपाय शोधा, फडणवीसांनी अधिकाऱ्यांना झापलं, खड्डे तात्काळ बुजविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांनी मेडिकल कॅालेज मंजूर केलं. जागा आहे का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य अधिकाऱ्याला केला. शिंदे साहेब पालकमंत्री होते तेव्हा चालायचं. आता ते मुख्यमंत्री आहेत.
गडचिरोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर एनएचआयच्या आधिकाऱ्यांना झापलं. करतो, केलं, ही नेहमीची बोगसगिरी थांबवा, कायम उपाय शोधा, अशा शब्दात फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. तर मुख्यमंत्र्यांनीही खड्डे तात्काळ आणि चांगल्या पद्धतीनं बुजवण्याचे आदेश दिलेत. पूरग्रस्त नागरिकांची व्यवस्था नीट करा. जेवन, आरोग्य आणि स्वच्छता पाळा. गरज असेल पांघरून आणि कपडे द्या, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. पूरग्रस्त नागरिकांची (Of flooded citizens) काळजी घेण्याच्या सूचना केल्या. दरवर्षी 112 गावांचा संपर्क तुटतो. याचं कायमस्वरूपी नियोजन करा. भामरागड (Bhamragad) तालुक्यातील 53 गावांचा संपर्क तुटला.
आरोग्य अधिकाऱ्याला धरले धारेवर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कडक शब्दात सांगितले, तयार राहा, पाऊस येणारंच. संपर्क तुटलेल्या गावांमध्ये 38 गरोदर माता आहेत. गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांनी मेडिकल कॅालेज मंजूर केलं. जागा आहे का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य अधिकाऱ्याला केला. शिंदे साहेब पालकमंत्री होते तेव्हा चालायचं. आता ते मुख्यमंत्री आहेत. आता होईपर्यंत नाही, होईलंच. असा व्हायला हवं, असंही देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य अधिकाऱ्याला खडसावले. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची मागणी केलीय.
#गडचिरोली मध्ये मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापन आढावा बैठक झाली. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis, खासदार @AshokNeteMP, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे उपस्थित होते.जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी पर्जन्यमान, पूरस्थितीबाबत माहिती दिली. pic.twitter.com/9xdLwdcGWY
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 11, 2022
गोसीखुर्द धरणाचे 27 दरवाजे उघडले
गोसीखुर्द धरणात सतत पाण्याची आवक अद्याप होत आहे. धरणाची वाढत असलेली पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी अखेर गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 27 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहेत. या 27 दरवाज्यातून 3002.32 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. विशेष म्हणजे दिवसभरातून दुसऱ्यांदा धरणाच्या दरवाज्यात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान सलग सहाव्या दिवशी ही गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडे ठेवण्याची वेळ धरण प्रशासनाला आली आहे. विशेष म्हणजे अद्यापही गोसीखुर्द धरणाच्या पानलोट क्षेत्रात पावसाने रिपरिप अद्यापही थांबली नाही. धरण प्रशासन अलर्ट मोडवर आहे. त्यातही प्रशासनाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासन डोळ्यात तेल टाकून आहे. गोसीखुर्द धरणाची स्थिती लक्षात घेता भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील नद्या दुथळी भरून वाहत आहेत. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.