वडिलोपार्जित मालकी असल्याचा दावा करत मंकावती तिर्थकुंड हडपण्याचा डाव, अखेर देवानंद रोचकरी बंधुवर गुन्हा दाखल

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी अखेर देवानंद साहेबराव रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब साहेबराव रोचकरी यांच्यासह अन्य अज्ञात आरोपींविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

वडिलोपार्जित मालकी असल्याचा दावा करत मंकावती तिर्थकुंड हडपण्याचा डाव, अखेर देवानंद रोचकरी बंधुवर गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 7:39 AM

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी अखेर देवानंद साहेबराव रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब साहेबराव रोचकरी यांच्यासह अन्य अज्ञात आरोपींविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. रोचकरी यांच्यावर मंकावती तिर्थकुंड स्वतःच्या नावावर करून हडप करण्यासाठी बोगस कागदपत्रे व पुरावे तयार करणे, फसवणूक करणे यासह कलम 420, 468,469,471 व 34 सह गुन्हा नोंद झालाय. याचा तपास पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद करीत आहेत.

तिर्थकुंड हडप प्रकरणात रोचकरी बंधूची प्रथम खबरमध्ये नावे असून त्यांना या प्रकरणात कुणी कुणी मदत केली? या कटात तुळजापूर भूमी अभिलेख कार्यालयासह नगर परिषद व इतर कार्यालयातील कोणते घोटाळेबाज अधिकारी अडकले आहेत? हे पोलीस तपासात समोर येणार असून राज्यभर गाजलेल्या या प्रकरणाचा तपास करणे व मूळ आरोपीसह कटात सहभागी अधिकारी यांना शोधणे हे एक मोठे आव्हान असणार आहे.

आरोपींकडून कारवाईला स्थगिती, मात्र एकनाथ शिंदेंनी स्थगिती उठवली

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चौकशी समितीच्या अहवालानंतर मंकावती तीर्थ कुंड प्रकरणी फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याला रोचकरी यांनी स्थगिती आणली होती. त्यानंतर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेंनी प्रकरणाची सत्यस्थिती पाहून प्रशासनाची बाजू ऐकल्यावर ही स्थगिती तात्काळ उठवली. मंत्र्यांनी स्थगिती उठवल्यानं पुढील कार्यवाहीबाबतचे आदेश नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी उ ना सार्दळ यांनी काढले. 2 ऑगस्ट रोजी देवानंद रोचकरी यांनी केलेल्या अपील व स्थगिती आदेशावर 9 ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने सुनावणी घेण्यात आली. यात वस्तुस्थिती विचारात घेऊन जिल्हाधिकारी यांचे आदेश कायम ठेवण्यात आले. त्यानंतर देवानंद रोचकरीसह इतरांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडून महत्त्वाचे 4 आदेश

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 4 वेगवेगळ्या मुद्यावर कारवाईचे आदेश जारी केले होते. जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक यांनी मूळ आखीव पत्रिकेवर महाराष्ट्र शासन यांचे नगर परिषद निगराणीखाली नोंद नियमित करावी. सदर कुंड प्राचीन असल्याने प्राचीन स्वरूपातील बांधकामात काही बदल झाले असतील तर औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक यांनी पुरातत्व संवर्धन कायदा 1904 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करावी. बनावट कागदपत्रे प्रकरणी नगर परिषद मुख्याधिकारी यांनी संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी आणि तुळजापूर तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून या जागेवर अतिक्रमण होणार नाही यांची दक्षता घ्यावी असे 4 आदेश देण्यात आले होते.

प्राचीन कुंड वडिलोपार्जित मालकीचं असल्याचा रोचकरींचा दावा

मंकावती कुंड हे देवानंद रोचकरी यांचे आजोबांचे आजोबा मूळ मालक शेटीबा मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीची व वडिलोपार्जित असल्याचा लेखी दावा मंत्र्यांकडे केला आहे. तसेच या प्राचीन कुंडाची नोंद त्यांच्या नावावर घ्यावी अशी मागणी रोचकरी यांनी केली आहे. मंकावतीराव रोचकरी यांचे नावाने मंकावती कुंड आहे तसेच या प्राचीन कुंडाची नोंद त्यांच्या नावावर घ्यावी अशी मागणी केली होती. मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीचे हे कुंड असून ही वडिलोपार्जित मालमत्ता पुरातन काळातील असून माझी सातवी पिढीची या कुंडावर मालकी हक्कात नोंद असून कब्जेदार आहे. तरी या विहिर जागेचे सुशोभीकरण व बांधकाम करण्यास बांधकाम परवाना द्यावा, अशी मागणी रोचकरी यांनी मंत्र्याकडे केली होती. मात्र, ती फेटाळून लावत रोचकरी बंधुवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार

तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण, तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे. गरीबनाथ दशअवतार मठाचे महंत सावजी महाराज, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष तथा मनसेचे जिल्हा संघटक अमर राजे कदम, राष्ट्रवादी पक्षाच्या कायदे विभागाचे तुळजापूर कार्याध्यक्ष अॅड. जनक धनंजयराव कदम पाटील व इतरांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांना 31 मे 21 रोजी लेखी तक्रार केली.

अहवालांनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश

या तक्रारीत तुळजापूर शहरातील प्राचीन श्री विष्णू तीर्थ (सध्या मंकावती कुंड नावाने प्रचलित) बेकायदेशीर काम करणाऱ्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे, नगर परिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे व भूमी अभिलेख कार्यालयाच्या उप अधीक्षक वैशाली गवई यांच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीची नेमणूक केली होती या समितीने केलेल्या अहवालांनंतर जिल्हाधिकारी यांनी फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते.

कुंडाची मालकी नगर परिषदेचीच

मंकावती तीर्थकुंडाची मालमत्ता ही नगर परिषद मालकीची कागदपत्रांची पाहणी व स्वतः जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन अहवाल दिला होता. तुळजापूर नगर परिषद यांनी 12 नोव्हेंबर 1982 रोजी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र लिहून मंकावती कुंड तुळजापूर नगर परिषदेच्या स्थापनेपूर्वी तुळजापूर लोकल फंडकडे व्यवस्थापन होते. तत्कालीन हैद्राबाद संस्थान शासनाने मंकावती कुंड लोकल फंडास व्यवस्थापनासाठी सोपविले होते. त्यामुळे या कुंडाची मालकी नगर परिषदेची आहे. मंकावती कुंडाच्या बनावट कागदपत्रे व पुरावे तयार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे तसेच पुरातत्व संवर्धन कायदा 1904 मधील तरतुदीच्या अनुषंगाने कार्यवाही करावी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी होते.

रोचकरी समर्थकांकडून फिल्मी डायलॉगसह बॅनरबाजी, देविभक्तांमध्ये नाराजी

नगर विकास मंत्र्यांनी स्थगिती दिल्यावर देवानंद रोचकरी समर्थकांनी ‘देवराज सरकार’ सह ‘हिंसा परमोधर्म’,’बाप म्हणतात तुळजापूरचा’, तुळजापूर तालुक्याचा 7/12 तुमच्या आईबापाच्या नावावर आहे का? मग कोणाच्या आईबापाच्या नावावर आहे, ते सांगा. मग 7/12 रिकामा करुन घेतो आम्ही, अशा आशयाचे फिल्मी डायलॉग असलेले देवानंद रोचकरी यांचे फोटोसह व्हिडीओ त्यांच्या समर्थकांनी स्थगिती आदेश मिळाल्यानंतर सोशल मिडीयावर व्हायरल केले होते त्यामुळे दहशत माजली होती तसेच याबाबत देविभक्तांत नाराजीचा सूर होता.

एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून ऐतिहासिक ठेवा जतन करण्यात यश

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेंनी स्थगिती उठवल्याने हे तिर्थकुंड वाचले आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचा व तुळजापूरचा ऐतिहासिक ठेवा जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात त्यांना मोठे यश येत आहे.

देवानंद रोचकरी यांचा भाजप पक्षासाठी संबंध नाही

देवानंद रोचकरी हे भाजपचे स्थानिक नेते म्हणून ओळखले जातात मात्र तुळजाभवानी देवीचे मंकावती तिर्थकुंड हडप केल्याच्या प्रकरणात त्यांचे नाव आल्याने हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या भाजपची मोठी नाचक्की झाली होती. देवानंद रोचकरी यांचा भाजप पक्षाशी दुरानव्ये संबंध नसल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिली. रोचकरी हे भाजप पक्षाच्या कोणत्याही पदावर पदाधिकारी म्हणून कार्यरत किंवा सक्रीय नसून ते पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाहीत त्यामुळे त्यांचा भाजपशी थेट संबंध राहिलेला नाही.

नगर विकास मंत्री शिंदे यांनि लक्ष द्यावे

दरम्यान तुळजापूर येथील अनेक प्राचीन वास्तू,कुंड येथील भूमाफियांनी हडप केले आहे यात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून भूमाफियाला लगाम लावणे गरजेचे आहे. रोचकरी यांच्यासह तुळजापूर येथे भूमाफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे

हेही वाचा :

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने 3 मंदिरं सील, तहसीलदार सौदागर तांदळे यांची कारवाई

दरमहिना लाखाचा हप्ता, उस्मानाबादेत महसूल विभागाची वरिष्ठ महिला अधिकारी रंगेहाथ अटक

गेल्याच वर्षी शासकिय सेवेत रुजू, 40 हजारांची लाच घेताना तरुण अधिकारी उस्मानाबादमध्ये अटक

व्हिडीओ पाहा :

FIR against Rochkari brothers in Mankavati Kund encroachment in Osmanabad

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.