बेकायदेशीपणे जमाव जमवून रॅली काढली, संभाजी भिडेंसह 80 धारकऱ्यांवर गुन्हा दाखल

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यासह शिवप्रतिष्ठानच्या 80 धारकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बेकायदेशीपणे जमाव जमवून रॅली काढली, संभाजी भिडेंसह 80 धारकऱ्यांवर गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 1:13 AM

सातारा : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यासह शिवप्रतिष्ठानच्या 80 धारकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. संभीजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कराड शहरात बेकायदेशीरपणे जमाव जमवून रॅली काढल्याप्रकरणी कराड पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. मंदिर प्रवेश, मास्क न लावणे आणि कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देश व आदेशाचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे (FIR against Sambhaji Bhide and 80 supporter for violation of covid restriction by gathering crowd).

बंडातात्या कराडकर यांच्या समर्थनार्थ आणि पोलीस कारवाई विरोधात रॅली

संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंडातात्या कराडकर यांच्यावर झालेल्या पोलीस कारवाईच्या विरोधात कराडमध्ये रॅली काढली. बंडातात्या कराडकर यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन करत पायी दिंडीला जाण्याचा प्रयत्न केल्यानं त्यांना कराडमध्ये त्यांच्या आश्रमशाळेत स्थानबद्ध करण्यात आलंय. या कारवाईच्या विरोधात आणि पायी वारीच्या समर्थनासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने भिडे गुरुजी यांचे नेतृत्वाखाली रॅली काढली. तसेच आपल्या मागण्यांचं निवेदन कराड तहसिलदार यांना दिलं. यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

नेमंक काय झालं?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी केलेल्या निर्देशांचे व आदेशांचे उल्लघंन केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यासह 70 ते 80 धारकर्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेत. 5 जुलै रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लघंन करुन त्यांनी कराड शहरात बेकायदा जमाव जमवून रॅली काढली. मंदीर प्रवेश बंदी असतानाही मंदीर उघडून मंदिरात प्रवेश केला. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार प्रशांत पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

भिडे गुरुजींसह सागर आमले, अजय पावस्कर, केदार डोईफोडे, प्रवीण माने, गणेश कापसे, रणजित पाटील, सुदर्शन पाटसकर यांच्यासह 70 ते 80 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, “कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पायी दिडीं काढून जाण्यासाठी शासनाने बंदी घातली आहे. परंतु ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लघंन करुन आषाढी वारीसाठी जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले.

“70 ते 80 धारकरी बंद असलेले साईबाबा मंदीर उघडून आत बसले”

शासनाने बंडातात्या कराडकर यांच्यासह वारकर्‍यांना वारीसाठी परवानगी द्यावी. या मागणीला समर्थन देत सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास संभाजी भिडे कराडमधील दत्त चौकात आले. यावेळी त्यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या 70 ते 80 धारकरी बंद असलेले साईबाबा मंदीर उघडून आत बसले. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले.

“रॅलीत सहभागी धारकर्‍यांनी विना मास्क रॅली काढत घोषणाबाजी केली”

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परवानगी न घेता, जमाव जमवून मोटर सायकल रॅली काढली. यावेळी रॅलीत सहभागी धारकर्‍यांनी विना मास्क शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचा भगवा झेंडा हातात घेवून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दत्त चौक ते प्रशासकीय इमारत येथे घोषणाबाजी केली. तसेच पायी चालत जात तहसिलदार यांना निवेदन दिले. यावेळीही त्यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लघंन केल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

वारीवर बंदी घालून द्रौपदीच्या पदाराला हात घालण्याचं सरकारकडून पाप,संभाजी भिडे यांची टीका

आषाढी वारीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळेच कोरोना वाढतोय, संभाजी भिडेंचं वक्तव्य

‘आंबे खाल्ल्यावर मुलं होतात छाप विधानं करणाऱ्यांनी संकटाच्या काळात दिशाभूल करु नये, अन्यथा….’

व्हिडीओ पाहा :

FIR against Sambhaji Bhide and 80 supporter for violation of covid restriction by gathering crowd

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.