Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Chandrapur Fire | चंद्रपूरच्या कचरा डेपोला आग, आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न; अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल

चंद्रपूरच्या कचरा डेपोला आग लागली. ही आग खूप मोठी आहे. यामुळं बहुतेक कचरा जळून खाक झाला. कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी शेड तयार करण्यात आले होते. त्या शेडलाही आग लागली.

Video Chandrapur Fire | चंद्रपूरच्या कचरा डेपोला आग, आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न; अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल
चंद्रपूर मनपाच्या कचरा संकलन डेपोला लागलेली आग. Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 10:42 AM

चंद्रपूर : महानगरपालिकेच्या कचरा संकलन डेपोला (Garbage Depot) मोठी आग लागली. संपूर्ण कचरा संकलन डेपोच आगीच्या विळख्यात आलंय. चंद्रपूर शहराच्या सीमेवर बल्लारपूर वळण मार्गावर (Ballarpur Marg) कचरा संकलन डेपो आहे. कचरा वर्गीकरण संयंत्रासह संपूर्ण यंत्रसामग्री आगीच्या विळख्यात आली. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र- चंद्रपूर मनपा -बल्लारपूर नगर परिषद, धारीवाल आदी ठिकाणांहून अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीचे नेमके कारण मात्र अज्ञात आहे. सकाळपासून अग्निशमन पथकांकडून (Fire brigade) आग विझवण्याचे काम सुरू आहे.

पाहा व्हिडीओ

नवीन शेड जळून खाक

आग पहाटे आग लागली. माहिती होताच मनपाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आजूबाजूच्या कंपन्यांच्या कंपन्यांना या आगीपासून धोका आहे. कचरा असल्यामुळं लवकर आग विझवता आली नाही. ही आग पसरत आहे. आगीचे लोळ पेटत आहेत. कचरा विल्हेवाटीच्या नवीन प्रोजेक्टसाठी शेड बांधला होता. तो जळून खाक झाला. मागील भाजपच्या सत्ताकाळात चंद्रपूर नगर महानगरपालिकेच्या या कचरा संकलन डेपोची उत्तम व्यवस्थापन केल्याने प्रशंसा झाली होती. कचरा डेपोचा परिसर शहरातील महत्त्वाचं ठिकाण आहे. याठिकाणी नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. कचरा विल्हेवाट लावून सिमेंट कंपनीत पाठविला जातो. याच ठिकाणी आग लागल्याने शेड संपूर्ण जळून खाक झाले.

अद्याप आगीवर नियंत्रण नाही

चंद्रपूरच्या कचरा डेपोला आग लागली. ही आग खूप मोठी आहे. यामुळं बहुतेक कचरा जळून खाक झाला. कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी शेड तयार करण्यात आले होते. त्या शेडलाही आग लागली. याठिकाणाहून कचरा हा सिमेंट कपंनीला पाठविला जात होता. याठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट केली जात होती. पण, आज अचानक आग लागली. या आगीमुळं कचरा डेपो चांगलाच धुमसत आहे. अग्निशमन पथक बंबच्या साह्याय्याने आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, अद्याप आग नियंत्रणात आलेली नाही.

मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य.
"औरंगजेब इथं गाडलाय...", राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेकडून बॅनरबाजी
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट.
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?.
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?.
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.