Video Akola Fire | मूर्तीजापूर येथे लक्ष्मी बायोकोल कंपनीला आग; कुटारासह ट्रॅक्टर, लोडर, मशीन खाक…!

अकोला जिल्ह्यातल्या मूर्तीजापूर ते खरब-ढोरे रस्त्यावरील लक्ष्मी बायोकोल फॅक्टरीत असलेल्या कुटाराच्या गंजीला आग लागली. या आगीमुळे फॅक्टरीमधील कुटार, बायकोलचा निर्माण करून ठेवलेला माल, 3 मशीन, ट्रॅक्टर, लोडर जळून खाक झाले.

Video Akola Fire | मूर्तीजापूर येथे लक्ष्मी बायोकोल कंपनीला आग; कुटारासह ट्रॅक्टर, लोडर, मशीन खाक...!
अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर येथे लक्ष्मी बायोकोल कंपनीला लागलेली आग.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 11:36 AM

अकोला : मूर्तीजापूर येथील दिनेश बुब (Dinesh Bub) यांची मूर्तीजापूर ते खरब–ढोरे रस्त्यावर लक्ष्मी बायोकोल (Laxmi Biocol) ( गट्टू ) फॅक्टरीला आग लागली. या आगीत बायोकोल फॅक्टरीत असलेल्या 2 हजार टन कुटार गंजीला आग लागल्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले. कुटाराच्या गंजीसह बायोकोलचा तयार असलेला 500 मेट्रिक टन माल, 3 मोठ्या मशिनी, ट्रॅक्टर, लोडर आगीत जळून खाक झाले. आगीची माहिती मिळाताच मूर्तीजापूर (Murtijapur) अग्निशमन दल दाखल झाले. आगीवार नियंत्रण सक्तीचे प्रयत्न करत आहे. आग मोठी असल्याने कारंजा, अकोला येथून अग्निशमन दलास पाचारण करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या आगीत 40 हजार स्क्वेअर फुटाचे टिन पत्र्याचे शेड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

कचरा पेटविल्यानं आग

अकोला जिल्ह्यातल्या मूर्तीजापूर ते खरब-ढोरे रस्त्यावरील लक्ष्मी बायोकोल फॅक्टरीत असलेल्या कुटाराच्या गंजीला आग लागली. या आगीमुळे फॅक्टरीमधील कुटार, बायकोलचा निर्माण करून ठेवलेला माल, 3 मशीन, ट्रॅक्टर, लोडर जळून खाक झाले. लक्ष्मी बायकोल फॅक्टरीला यापूर्वी ही 2017 साली आग लागली होती. त्यावेळी मोठे नुकसान झाले होते. या आगीत कुठलीही जीवितझाली नसून, बायोकोल फॅक्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग फॅक्ट्री मागील कचरा कोणीतरी पेटवून दिल्याने ही आग फॅक्ट्रीपर्यंत पोहचली असल्याचं बोलल्या जात आहे.

पाहा व्हिडीओ

सिलिंडरच्या स्फोटात पाच जखमी

मंगरुळपीर तालुक्यातील पेडगाव येथील महिला चित्रा खेरखार यांच्या घरातील आग लागून गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. ही आग विझविण्यासाठी गेलेले तीन जण बाजुच्या घरावरून पाणी टाकत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये पाच जण जखमी झालेत. या आगीत घरातील संसार उपोयोगी साहित्य जळून खाक झाले. हजारो रुपयांचं नुकसान झालं आहे. साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या सदस्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. यानंतर मोठ्या शिताफीने सदर आगीवर नियंत्रण मिळवण्यात पथकाचे सदस्य व गावकऱ्यांना यश आले.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....