गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात पूरस्थिती गंभीर, सिरोंचा येथे 400 हून अधिक नागरिकांना सुरक्षितरित्या काढले बाहेर

सिरोंचा येथे गोदावरी नदीने 105 मीटरची धोका पातळी ओलांडली आहे. या तालुक्यातील एकूण 17 गावांमध्ये दवंडी पिटवून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात. 334 हुन अधिक नागरिकांना पुरातून बाहेर काढण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात पूरस्थिती गंभीर, सिरोंचा येथे 400 हून अधिक नागरिकांना सुरक्षितरित्या काढले बाहेर
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 4:43 PM

व्येंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : जिल्ह्यातील दक्षिण भागात पूरस्थिती गंभीर झाली आहे. गोदावरी खोऱ्यात तेलंगणा राज्यात अतिमुसळधार पाऊस पडला आहे. परिणामी गोदावरी नदी पात्र सोडून वाहू लागली आहे. त्याचा परिणाम टोकावरच्या सिरोंचा तालुक्याला बसला आहे. सीमेवरच्या मेडीगड्डा धरणातूनही महाविसर्ग सुरू आहे. 24 तासांपासून गडचिरोली जिल्ह्यातील या परिस्थितीवर स्वतः जिल्हाधिकारी संजय मिना वॉर रूममधून लक्ष ठेवत आहेत. तेलंगणात मुसळधार पावसामुळे तिथल्या धरणांमधून विसर्ग केला जातो. मागील वर्षी झालेली पूरस्थिती यंदाही कायम राहणार आहे. सिरोंचा येथे गोदावरी नदीने 105 मीटरची धोका पातळी ओलांडली आहे. या तालुक्यातील एकूण 17 गावांमध्ये दवंडी पिटवून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात. 334 हुन अधिक नागरिकांना पुरातून बाहेर काढण्यात आले आहे.

हेलिकॅप्टर्सही सज्ज

सिरोंचा येथे औषधे, रुग्णालय व निवास, भोजन व्यवस्थेसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 14 रस्ते बंद झाल्याची माहिती आहे. सध्या पाऊस सुरूच असून जिल्ह्यात जुलै महिन्यात वार्षिक सरासरीच्या 153% पाऊस नोंदविला गेला आहे. आपत्कालीन मदतीसाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने हेलिकॉप्टर्सदेखील सज्ज ठेवली आहेत.

धरणातील पाण्यामुळे पूरपरिस्थिती

तेलंगणात उद्भवलेली पूर परिस्थिती आणि तेथील धरणातून सोडण्यात आलेलं पाणी यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील नदी काठावरील गावांना पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने येथे रेड अलर्ट घोषित केला आहे. सिरोंचा तालुका महाराष्ट्राच्या सीमेवरील तालुका असून सीमेला लागून तेलंगणाचा भाग आहे. गोदावरी आणि प्राणहिता नदीला तेलंगणातल्या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

तेलंगणामधली काही शहरे पुराच्या तडाख्यात सापडलेत. पाणी गोदावरी आणि प्राणहिता नदीमध्ये येत आहे. उद्या सकाळपर्यंत नदीकाठावरील अनेक गावांमध्ये गंभीर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज, उद्या शाळा, महाविद्यालयांना सुटी

सिरोंचातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तेलंगणातील धरणाचा गोदावरी, प्राणहिता नदीला महापूर आला आहे. सिरोंचा तालुक्यात 28 व 29 जुलैला शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.