Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या तलावावर परदेशी पाहुण्यांचे दर्शन; दीड हजार किमी उडण्याची क्षमता असलेल्या पक्ष्यांनी ठोकला तळ

विशेष म्हणजे हे पक्षी वजनाने आणि आकाराने मोठे आहेत. त्यांची उडण्याची क्षमतादेखील मोठी आहे. त्यामुळे पक्षिप्रेमी या पक्ष्यांच्या प्रेमात पडले आहेत.

या तलावावर परदेशी पाहुण्यांचे दर्शन; दीड हजार किमी उडण्याची क्षमता असलेल्या पक्ष्यांनी ठोकला तळ
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 4:06 PM

चंद्रपूर : विदर्भातील वातावरण पक्ष्यांसाठी पोषक आहे. त्यामुळे येथे पक्षिनिरीक्षक मोठ्या प्रमाणात आहेत. विदेशी पक्षी विशिष्ट कालावधीसाठी येथे येतात. हे पक्षी येथे येऊन विणीचा हंगाम पूर्ण करतात. त्यानंतर पिल्लासह परत जातात. गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध, सिरेगावबांध येथील तलावावर हे पक्षी येत असतात. तसेच विदर्भातील इतर काही तलावांवर या पक्ष्यांचे आगमन होते. सध्या एका विदेशी पक्षाचे आगमन झाले आहेत. विशेष म्हणजे हे पक्षी वजनाने आणि आकाराने मोठे आहेत. त्यांची उडण्याची क्षमतादेखील मोठी आहे. त्यामुळे पक्षिप्रेमी या पक्ष्यांच्या प्रेमात पडले आहेत. तलावावर हे पक्षी पक्षिप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत.

rajhans 2 n

राजहंस पक्ष्यांचे थवे

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या सावरगाव येथील तलावावर दरवर्षी परदेशी पक्षी येत असतात. गेल्या सात ते आठ वर्षांपासून या तलावावर अनेक स्थलांतरित पक्षी दर्शन देत आहेत. राजहंस ( Bar-headed goose) जे हिमालय पर्वत (28 हजार फूट उंचीवर उडणारे) हिमालयातून, तिबेट, कझाकस्तान, रशिया आणि मंगोलियामार्गे उडतात. त्या राजहंस पक्षाचे थवे येथे येतात. हे पक्षी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच ऑक्टोबरच्या महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात येतात. मार्चच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीस परत जातात.

हे सुद्धा वाचा

डोक्यावर आणि मानेवर खुणा

एका दिवसात 1600 किमी उडण्याची क्षमता असलेल्या या राजहंसाच्या कळपाने सावरगावच्या तलावासह संपूर्ण विदर्भातील तलावांमध्ये तळ ठोकला आहे. त्यांना या तलावाचा भवताल आवडलाय म्हणूनच दरवर्षी इथे येत असतात. दोन ते तीन किलो वजनाच्या या राजहंसच्या डोक्यावर आणि मानेवर काळ्या खुणा असतात आणि त्यांचा रंग फिकट राखाडी असतो.

दहा राजहंसचे दर्शन

राजहंस पक्ष्याच्या डोक्यावर दोन काळ्या पट्ट्यांसह पांढरा रंग असतो. पाय मजबूत आणि केशरी रंगाचे असतात. सावरगाव तलावात सध्या दहा राजहंसचे दर्शन झाले आहे. याशिवाय चक्रांग , तलवार बदक , थापाट्या, नदीसुराई, शेकाट्या, करकोचा, इत्यादी अनेक पक्षी हे पक्षीमित्र व स्वाब संस्था पक्षी अभ्यासकांच्या निदर्शनास आले. अशी माहिती पक्षीमित्र यश कायरकर यांनी सांगितलं.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.