Ichalkaranji Fire : इचलकरंजीत गुंज व स्क्रपच्या स्क्रॅप गोदामांना आग, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

इचलकरंजी शहरालगत असलेल्या चंदूर ओढ्यानजीक स्क्रॅपचे अनेक गोदामे आहेत. त्यामध्ये स्क्रॅप साहित्य, वेस्टेज सूत, वेस्टेज कोन त्यासह कापूस, कार्टन आदी आहेत. या गोडाऊन पैकी एका वेस्टेज कापसाच्या गोडाऊनला शनिवारी रात्री 10 च्या सुमारास आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण करीत चार गोदामांना भक्ष्यस्थानी घेतले.

Ichalkaranji Fire : इचलकरंजीत गुंज व स्क्रपच्या स्क्रॅप गोदामांना आग, कोट्यवधी रुपयांचे नुकसान
इचलकरंजीत गुंज व स्क्रपच्या स्क्रॅप गोदामांना आग
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 3:43 PM

इचलकरंजी : इचलकरंजी-चंदूर मार्गावरील ओढ्या नजीक असलेल्या गुंज व स्क्रपच्या स्क्रॅप गोदामां (Godwons)ना आग (Fire) लागल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. यामध्ये चार गोदमांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी शिवाजी नगर पोलिस दाखल झाले आहेत. सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. यासाठी इचलकरंजी, हुपारी, जयसिंगपूर कुरूंदवाड येथील अग्निशामक दलाचे कर्मचारी काम करीत होते. (Four godowns set on fire in Ichalkaranji, Loss of crores of rupees)

आगीत चार गोदाम भक्ष्यस्थानी, आगीचे कारण अस्पष्ट

इचलकरंजी शहरालगत असलेल्या चंदूर ओढ्यानजीक स्क्रॅपचे अनेक गोदामे आहेत. त्यामध्ये स्क्रॅप साहित्य, वेस्टेज सूत, वेस्टेज कोन त्यासह कापूस, कार्टन आदी आहेत. या गोडाऊन पैकी एका वेस्टेज कापसाच्या गोडाऊनला शनिवारी रात्री 10 च्या सुमारास आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण करीत चार गोदामांना भक्ष्यस्थानी घेतले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. यावेळी इचलकरंजी दोन गाड्या, जवाहर साखर कारखान्याची एक फायर गाडी, जयसिंगपूर एक, कुरूंदवाड येथील एक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. आगीच्या धुराचे लोट एक ते दोन किलोमीटर अंतर परिसरात दिसत होते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

उल्हासनगरात जीन्स कारखान्याला मोठी आग

उल्हासनगरमध्ये कॅम्प 5 भागातील जय जनता कॉलनीतील जीन्स कारखान्याला मोठी लागली असून यात संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे. अग्नीशमन दलाला आगीची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यास सुरवात केली. मात्र कारखाना दाटीवाटीच्या वस्तीत असल्याने आग पसरण्याची भीती होती. मात्र अग्नीशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करुन आग नियंत्रणात आणली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. (Four godowns set on fire in Ichalkaranji, Loss of crores of rupees)

इतर बातम्या

Pimpri-Chinchwad crime| पिंपरीत वल्लभनगर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

खुनाच्या बदल्यात खुन ! विक्रमसिंह चौहान यांना गोळ्या घातल्या, शिवसेनेचे सुदेश चौधरी यांच्यासह 8 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.