चालकाचे नियंत्रण सुटले आणि चार प्रवाशांना गमवावा लागला जीव, टेम्पोची मेजीकवर जोरदार धडक

टेम्पो आणि मेजीकची अपघातानंतरची दृश्य पाहिल्यानंतर अपघात किती भयानक होता, याची जाणीव होते. घटनेनंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मृतदेह काढण्यासाठी तसेच गरजूंना रुग्णालयात पोहचवण्यासाठी मदत केली.

चालकाचे नियंत्रण सुटले आणि चार प्रवाशांना गमवावा लागला जीव, टेम्पोची मेजीकवर जोरदार धडक
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 9:47 PM

राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : टेम्पोचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याने थेट मेजीकला धडक दिली. यात चार जण जागीच ठार झाले. तर चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर मृतकांना काढण्यासाठी गाडीचा पत्रा कापावा लागला. टेम्पो आणि मेजीकची अपघातानंतरची दृश्य पाहिल्यानंतर अपघात किती भयानक होता, याची जाणीव होते. घटनेनंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मृतदेह काढण्यासाठी तसेच गरजूंना रुग्णालयात पोहचवण्यासाठी मदत केली.

भोकर तालुक्यातील नांदेड रस्त्यावरील सिताखांडी घाटात एका टेम्पोचा आणि मेजीकचा भीषण अपघात झाला. या अपघातात मेजीकमधील चार जण जागीच ठार झाले. तर, चार जण गंभीर झाल्याची घटना आज घडली आहे. नांदेड रस्त्यावरील सिताखांडी घाटात नांदेडकडे जाणाऱ्या टेम्पो ( क्र. एह एच १९ एस ४९९३) च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

nanded 2 n

हे सुद्धा वाचा

अशी आहेत मृतकांची नावे

नांदेड ते भोकर प्रवासी वाहतूक करणाऱ्या मेजीक (क्र. एम एच २६ बी एक्स ३८१५) यास भरधाव टेम्पोने जबर धडक दिली. या अपघातात चार प्रवासी जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांची नावे – भुलाबाई गणेश जाधव (वय ४५ रा. पोटातांडा, ता. हिमायतनगर), संदीप किशनराव किसवे (वय २६, रा. हळदा ता. भोकर), संजय ईरबा कदम (वय ४८ रा. हिमायतनगर) आणि बापुराव रामसिंग राठोड (वय ५७ रा. पाकीतांडा, ता. भोकर) अशी आहेत.

अशी आहेत जखमींचे नावे

या अपघातात परमेश्वर केशव महाजन (रा. इरसनी), कैलास गणपत गडमवार (रा. सिरंजणी ता. हिमायतनगर), मंगेश गोविंदराव डुकरे (वय २२ रा. लहान ता. अर्धापूर) आणि देवीदास गणेश जाधव ( रा. पोटातांडा) हे जखमी झालेत.

गाडीचा पत्रा कापावा लागला

अपघात इतका भयंकर होता की, मेजीकमधील मृतांना काढण्यासाठी पत्रा कापावा लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच या अपघातातील काही गंभीर जखमींना घटनास्थळाहूनच नांदेडला रवाना करण्यात आले. मृतक आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.