Gadchiroli Crime : मानवतेला काळीमा फासणारी घटना, धक्कादायक घटनेने गडचिरोली हादरले

विवाहित महिला प्रसुतीसाठी माहेरी आली होती. शेतीची कामे सुरू असल्याने घरातील सर्व जण कामानिमित्त शेतावर गेले होते. ती घरी एकटीच होती.

Gadchiroli Crime : मानवतेला काळीमा फासणारी घटना, धक्कादायक घटनेने गडचिरोली हादरले
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 8:22 PM

व्येंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : कुरखेडा तालुक्यात धक्कादायक घटना घडली. या घटनेने गडचिरोलीच नव्हे तर विदर्भ हादरले. धमधीटोला येथील दोन नराधमांनी कुकर्म केले. तेही एका आठ महिन्याच्या गर्भवती महिलेसोबत. त्यामुळे या दोन नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. कुरखेड्यावरून दोन किलोमीटर अंतररावर धमदीटोला गाव आहे. विवाहित महिला प्रसुतीसाठी माहेरी आली होती. ती आठ महिन्यांची गर्भवती होती. तरीही दोन सख्या भावांच्या वासनेची बळी ठरली.

कुटुंबीयांना सांगितली आपबिती

विवाहित महिला प्रसुतीसाठी माहेरी आली होती. शेतीची कामे सुरू असल्याने घरातील सर्व जण कामानिमित्त शेतावर गेले होते. ती घरी एकटीच होती. दुपारी १२ वाजता दोन भाऊ विवाहित महिलेच्या घरात शिरले. दोघांनीही तिच्यावर अत्याचार केला. कुटुंबीय संध्याकाळी घरी आले. त्यानंतर तिने आपबिती कुटुंबीयांना सांगितली. गुरुवारी रात्री दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन्ही नराधमांना अटक

ताराचंद कपूरडेरीया (वय ३० वर्षे) आणि संजय कपूरडेरीया (वय ३२ वर्षे)अशी या दोन नराधम भावांची नावे आहेत. कुरखेडा पोलिसांनी रात्रीच दोघांनाही बेड्या ठोकल्या. पीडित महिलेने कुरखेडा पोलिसांत तक्रार दिली. ठाणेदार संदपी पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रात्रीच दोन्ही आरोपींना अटक केली.

पीडितेची जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी

दोन्ही नराधमांविरोधात विरोधात भादंवि ३७६, ३७६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला. पीडित महिला ८ महिन्यांची गर्भवती आहे. त्यामुळे वैद्यकीय परिक्षणाकरिता गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.

ताराचंद आणि संजय कपूरडेरीया या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपास ठाणेदार संदीप पाटील यांचा मार्गदर्शनात साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे करीत आहेत. या विकृत घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.