Gadchiroli Flood : गडचिरोली जिल्ह्यात तिसऱ्यांदा पुराचा फटका, मिरची, धानाचे मोठं नुकसान, शेतकरी म्हणतात, भरपाई केव्हा मिळणार?

जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद असल्यामुळे आमच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. जवळपास सात आठ दिवसांपासून आम्ही याच भागात लटकलो आहोत. असं ॲम्बुलन्स चालक बहादूरखान म्हणाले.

Gadchiroli Flood : गडचिरोली जिल्ह्यात तिसऱ्यांदा पुराचा फटका, मिरची, धानाचे मोठं नुकसान, शेतकरी म्हणतात, भरपाई केव्हा मिळणार?
गडचिरोली जिल्ह्यात तिसऱ्यांदा पुराचा फटका, मिरची, धानाचे मोठं नुकसान
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 7:34 PM

गडचिरोली जिल्ह्यात गंभीर पूर परिस्थिती कायमच आहे. पूर परिस्थितीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे पेरण्या व रोवणा पूर्णपणे नष्ट झाला. या भागात पंधरा दिवसांअगोदर शेतकऱ्यांनी (Farmers) मिरची, कापूस (Cotton) व धानाच्या पेरण्या केल्या होत्या. या भागात पुराचा फटका (Flood hit) सतत दीड महिन्यात तीनदा बसलेला आहे. आम्ही दोनदा पेरण्या केल्या. पेरण्या पूर्णपणे नष्ट झाल्या. कापसाची पेरणी मिरचीचे रोपे आणि धान्याची पेरणी पूर्णपणे पुराच्या पाण्यात वाहून गेली. आता तिसऱ्यांदा पेरणी करण्यासाठी आमच्याकडे पैसे पण नाही, अशी गंभीर परिस्थिती आमची झालेली आहे. शासनही कितपत मदत करेल आणि आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचे समस्या सांगू तरी कोणाला असा प्रश्न या शेतकर्‍यांना पडलेला आहे, असं राजू जगतापी म्हणाले.

सुट्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान

जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद असल्यामुळे आमच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. जवळपास सात आठ दिवसांपासून आम्ही याच भागात लटकलो आहोत. असं ॲम्बुलन्स चालक बहादूरखान म्हणाले. या अगोदर दोनला आमच्या शाळेच्या क्रीडांगणात पूर आला होता. पूर आल्यामुळे शाळेला सुट्टी देण्यात आली. आता तिसऱ्यांदा पूर वाढत असल्यामुळे आमच्या शाळेला पुन्हा सुट्टी मिळणार आहे. आमचे शैक्षणिक खूप नुकसान होत आहे, असं शाळेचे विद्यार्थी सांगतात.

अनेक भागात जनजीवन विस्कळीत

या पुरामुळे सातारा पाऊस किंवा पाणी या आमच्या क्रीडांगणात राहत आहे. त्यामुळं आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आम्ही यावर्षी कसा अभ्यास करू असा प्रश्न मला पडलेला आहे. एवढा मोठा पूर होता. परंतु अनेक दुर्गम भागात महसूल विभागाचे कर्मचारी नाहीत. या पुरामुळे आमचे घर कुटुंब आणि अनेक सामानाचे नुकसान झाले. पुरात नुकसान झालेले नगरम येथील रहिवासी आहेत. मेडिगट्टा धरणामुळे अनेक शेतकऱ्यांचे व अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालेले आहे. आम्ही सांगू तरी कुणाला असा प्रश्न या शेतकर्‍यांना पडलेला आहे.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.