Gadchiroli | भामरागड तालुक्यात अजूनही 150 घरे पाण्याखाली, पुरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत
सततच्या पावसामुळे गडचिरोलीतील नद्यांना पूर आला होता. इतकेच नाही तर गेल्या तीन दिवसांपासून अनेक भागांमध्ये विजपुरवठा खंडित देखील करण्यात आलायं. यामुळे भामरागड वासियांचे जनजीवन विस्कळीत झाले. पुरामुळे 214 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.
गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात मागील तीन दिवसांपासून पूर स्थिती कायम होती. आज सकाळपासून पूर ओसरत आलायं. मात्र, अजूनही अनेक घरेही पाण्याखालीच आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस (Rain) सुरूयं. यामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. या पावसाचा सर्वाधिक फटका हा गडचिरोली जिल्हामध्ये बसलेला दिसतोयं. भामरागड (Bhamragarh) तालुक्यातील जवळपास 150 घरे पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
पुरामुळे 214 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलविले
सततच्या पावसामुळे गडचिरोलीतील नद्यांना पूर आला होता. इतकेच नाही तर गेल्या तीन दिवसांपासून अनेक भागांमध्ये विजपुरवठा खंडित देखील करण्यात आलायं. यामुळे भामरागड वासियांचे जनजीवन विस्कळीत झाले. पुरामुळे 214 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती.
वीज सेवा खंडित नागरिकांचे मोठे हाल
14 ऑगस्टपासून भामरागड तालुक्यात सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत असल्याने तेथील वीज सेवा खंडित करण्यात आली होती. इतकेच नाही तर 14 ऑगस्टपासून दूरध्वनी सेवा देखील खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या. जिल्ह्यात पुराचा सर्वात जास्त फटका भामरागड तालुक्यालाच बसल्याचे बोलले जात आहे. इंद्रावती नदीची पाणी पातळी अजूनही जास्तच आहे.
पावसामुळे घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान
दहा दिवस गडचिरोली जिल्ह्यात पुराची स्थिती होती. दक्षिण गडचिरोलीत केले दहा दिवस पुराने हाहाकार माजविला होता. या पावसामध्ये घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एक जूनपासून जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 169 टक्के पावसाची नोंद झाली आहे. आता कुठेतरी पूरस्थिती दूर झालीयं. मात्र, अजूनही वीज सेवा खंडितच आहे.