बँड, बाजा, बारात सारं काही आलं; पण, या कारणामुळे थांबवला गेला विवाह

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांच्या उपस्थितीत वर-वधू पक्ष यांना एकत्र बसवण्यात आले. बालविवाह बाबतचे दुष्परिणाम व कायद्यानुसार होणारी कार्यवाही याबाबत कुटुंबातील सदस्यांना माहिती देण्यात आली.

बँड, बाजा, बारात सारं काही आलं; पण, या कारणामुळे थांबवला गेला विवाह
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 8:47 AM

व्येंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारला चामोर्शी शहरात एक बालविवाह होणार आहे, अशी माहिती पोलीस स्टेशन चामोर्शी यांना मिळाली. त्यांनतर पोलीस स्टेशन चामोर्शी येथील पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांनी सदर माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांना दिली. लगेच जिल्हा बाल संरक्षण टीम आणि पोलीस पथक यांनी सदर बालविवाह रोखण्याकरिता विवाह स्थळ भेट दिली. मुलाची व मुलीचं जन्म पुरावा तपासणी केली. बालिका 18 वर्षाखालील आणि मुलगा 21 वर्षाखालील असल्याची खात्री पटली. लगेच बालिकेचे व मुलाचे आणि कुटुंबाचे समुपदेशन करण्यात आले. मुलीकडचे व मुलाकडचे दोन्ही मंडळी हे नागभिड तालुका जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहेत. ते चामोर्शी शहरात फेब्रुवारी महिन्यात रोजगाराच्या शोधात कामाकरिता (भटकंती जमात) आले होते. तसेच एक दिवसा आधी त्यांनी हळदीचा कार्यक्रम पण पार पाडला.

gadchiroli new

वर-वधूचे समुपदेशन

दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता वधू व वरांकडील नातेवाईक यांच्या उपस्थितीत बालविवाह चामोर्शी येथे होणार आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली यांनी सदर बालिकेच्या तात्पुरता स्वरूपात राहणाऱ्या ठिकाणी त्याचे घर गाठले. मुलीच्या आई वडिलांकडून मुलीचे 18 वर्ष व मुलाचे 21 वर्ष पूर्ण होइपर्यंत बालिकेचे विवाह करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेतले. बालिकेचे व मुलाचे समुपदेशन करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

यांनी केली ही कारवाई

तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांच्या उपस्थितीत वधू पक्ष यांना एकत्र बसवण्यात आले. बालविवाह बाबतचे दुष्परिणाम व कायद्यानुसार होणारी कारवाई याबाबत उपस्थित कुटुंबातील सदस्यांना माहिती देण्यात आली. सदर कारवाई जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, पोलीस स्टेशन चामोर्शीच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ, बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे, पोलीस स्टेशन चामोर्शी येथील पोलीस जीवन हेडावू, सामाजिक कार्यकर्ते जयंत जथाडे, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार यांनी केली. अशाप्रकारे जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे व चाइल्ड लाईन टोल फ्री नंबर, 1098 वर बाल विवाहाबाबत संपर्क करावे, असे आवाहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.