रुग्णालयात शिरले, खंडणी मागितली; पोलिसांनी असा लावला छडा

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाणे आरमोरी यांच्या संयुक्त कार्यदलाची स्थापना केली. या दलाने संशयितांचा माग काढला.

रुग्णालयात शिरले, खंडणी मागितली; पोलिसांनी असा लावला छडा
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 7:36 PM

व्येंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : ही घटना आहे आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयातील. डॉ. सोनाली धात्रट यांच्या निवासस्थानी ४ ऑगस्ट २०२३ रोजी काही आरोपी शिरले. त्यांनी डॉ. धात्रट यांच्या पर्समधून एक लाख रुपये काढून घेतले. एकूण पाच लाख रुपये मागितले. मागणी पूर्ण न झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. याची तक्रार डॉ. धात्रट यांनी आरमोरी पोलिसांत केली. आरमोरी पोलिसांनी आरोपींविरोधात दरोडा, घरास घुसखोरी तसेच धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपास सुरू केला.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाणे आरमोरी यांच्या संयुक्त कार्यदलाची स्थापना केली. या दलाने संशयितांचा माग काढला. रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले.

धक्कादायक खुलासे

याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी नागपूर शहरातून पाच जणांना अटक केली. तपासादरम्यान धक्कादायक खुलासे समोर आले. काही आरोपींचे पेड न्यूज नावाच्या वृत्तवाहिनीशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. यावरून अधिकाऱ्यांनी चॅनलशी संबंधित तपास सुरू केला आहे.

१२ तासांत आरोपींचा छडा

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता आणि सहाय्यक पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. तक्रार दाखल केल्यापासून अवघ्या 12 तासांत आरोपीला पकडण्यात मोठे यश आले. यामुळे पोलिसांच्या या पथकाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

या पाच जणांना केली अटक

अशाप्रकारे गडचिरोली पोलिसांनी खंडणी रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी नागपुरातील एका पत्रकारासह पाच जणांना अटक केली. नागपुरातील यूट्यूब पत्रकार अमित वांद्रे, दिनेश कुंभारे, विनय देशभ्रतार, रोशन बारमासे आणि सुनील बोरकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. या टोळीने आरमोरी येथील एका महिला डॉक्टरसह तिच्या पतीला धमकावून 5 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.