जाण्याचे साधन नसल्याने ट्रकमध्ये बसला नि घात झाला, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात मोठा अपघात

लोहखनिजाची वाहतूक करणारे ट्रक त्यांना मदतगार ठरतात. पण, ही मदत एका व्यक्तीच्या जीवावर बेतली.

जाण्याचे साधन नसल्याने ट्रकमध्ये बसला नि घात झाला, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात मोठा अपघात
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 3:54 PM

व्येंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : सुरजगड येथे लोहखनिजाची वाहतूक करणारे ट्रक मोठ्या प्रमाणात आहेत. या ट्रकमुळे रस्त्याावरील गावांमध्ये असंतोष आहे. लोहखनिजाची वाहतूक दुसऱ्या मार्गाने करावी, अशी काही गावकऱ्यांची मागणी आहे. कारण या ट्रकमुळे अपघात होत असतात. असाच एक अपघात मुरखळा ग्रामपंचायतीजवळ झाला. समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या भरात ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्याने बाजूला ट्रक वळवण्याचा प्रयत्न केला. त्यात समोरील प्रवासी गाडीखाली आला. तसेच ट्रकमध्ये प्रवासी म्हणून बसलेल्या एका प्रवाशाला आपले प्राण गमवावे लागले. बसची वाट पाहून तो थकला होता. पण, आदिवासी भाग असल्याने गावांची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रवासी वाहने लवकर सापडत नाही. अशावेळी लोहखनिजाची वाहतूक करणारे ट्रक त्यांना मदतगार ठरतात. पण, ही मदत एका व्यक्तीच्या जीवावर बेतली.

पादचाऱ्यासह दोन जण ठार

गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील मुरखळा (नवेगाव) ग्रामपंचायत जवळ अचानक दुचाकी समोर आली. समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याचा ट्रकचालकाने प्रयत्न केला. ट्रकच्या भीषण अपघातात पादचाऱ्यासह २ जण ठार, तर चालक गंभीर जखमी झाला. मुकरू गोमसकार (वय ५५ रा.मुरखळा) असे मृत पादचाऱ्याचे नाव आहे. आणखी एका मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

लोहखनिजाची वाहतूक करणारा ट्रक

सुरजागड येथे लोह खनिजाची वाहतूक करणारा ट्रकचालक पिंटू मजोके किसाननगर येथे घरी जाण्यासाठी निघाला होता. वाटेत व्याहाड येथे जाण्यासाठी उभ्या असलेल्या एका प्रवाशाला गाडीत बसवले. दरम्यान सकाळी ११ वाजताच्या सुमारास गडचिरोली- चंद्रपूर मार्गावरील मुरखळा ग्रामपंचायत जवळ ट्रकसमोर दुचाकीस्वार आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात झाला.

gad accident 2 n

अनोळखी प्रवाशाचा मृतदेह गाडीत

यावेळी ट्रकने ग्रामपंचायत समोरील स्मारकाला धडक दिली. यात मुरखळा येथील रहिवासी मुकरू गोमसकार यांचा आणि ट्रकमध्ये बसलेल्या अनोळखी प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक पिंटू मजोके हा गंभीर जखमी झाला आहे. अनोळखी प्रवाशाचा मृतदेह गाडीत अडकला होता. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. अनोळखी मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.