चिमूर नगरपरिषदेचा प्रताप, उमा नदीपात्रात कचरा डम्पिंग, नदी प्रदूषित, स्थानिक दुर्गंधीने त्रस्त
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर नगरपरिषदेचा अनोखा प्रताप समोर आला आहे. नगर परिषदेद्वारे थेट उमा नदीच्या पात्रात कचरा डम्पिग केले जात आहे. शहरातून एकत्र केलेला कचरा नदीच्या पाण्यात जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर नगरपरिषदेचा अनोखा प्रताप समोर आला आहे. नगर परिषदेद्वारे थेट उमा नदीच्या पात्रात कचरा डम्पिग केले जात आहे. शहरातून एकत्र केलेला कचरा नदीच्या पाण्यात जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. तर स्थानिक दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. Garbage dumping in Uma river, Uma river polluted Chimur Nagar parishad Chandrapur
देशभर नदी स्वच्छतेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च, चिमूरमध्ये नगर परिषदेकडून नदी प्रदूषण
भर पावसाळ्यात प्रदुषणाची समस्या उग्र रुप घेत असली तरी नगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. देशभर एकीकडे नदी स्वच्छतेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना दुसरीकडे चिमूर नगर परिषद प्रदूषणात भर घालत आहे.
नागरिक दुर्गंधीने त्रस्त, पर्यटकांनाही प्रदुषणाची झळ
याच मार्गांवरुन देशी-विदेशी पर्यटक जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे कूच करतात. स्थानिक नागरिक- पर्यटक देखील असह्य दुर्गंधीने त्रस्त होत इथून मार्गक्रमण करतात. पर्यावरण प्रेमींनी याबाबत नगर परिषदेला वारंवार निवेदने दिली मात्र कुठलीच ठोस कारवाई झालेली नाही.
नगरपरिषदेविरोधात ‘save Uma river’ आंदोलन
याच परिसरात डेंगुचे रूग्ण सापडल्याने चिंतेत भर पडली आहे. या घनकचऱ्यामध्ये प्लास्टिक, मृत जनावरांचे अवशेष, कागद व ओला कचरा आदी समाविष्ट असल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. हे रोगराईला निमंत्रण आहे. उमा नदीला वाचविण्यासाठी नगरपरिषदेविरोधात ‘save Uma river’ आंदोलन करण्यात आले.
(Garbage dumping in Uma river, Uma river polluted Chimur Nagar parishad Chandrapur)
हे ही वाचा :
दरडीतून बाळाला वाचवताना भिंत कोसळली, 14 वर्षांच्या धावपटूचा पाय कापण्याची वेळ, आर्थिक मदतीचं आवाहन