वादळाची परंपरा, ‘गोकुळ’ची सभा आता ऑनलाईन, मात्र शौमिका महाडिकांचा कडाडून विरोध

गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडत आहे. सत्तांतरानंतरची ही पहिलीच वार्षिक सभा होत आहे. ऑनलाईन पद्धतीने होत असलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी विश्वास पाटील असणार आहेत.

वादळाची परंपरा, 'गोकुळ'ची सभा आता ऑनलाईन, मात्र शौमिका महाडिकांचा कडाडून विरोध
गोकुळ दूध संघ
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 7:53 AM

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडत आहे. सत्तांतरानंतरची ही पहिलीच वार्षिक सभा होत आहे. ऑनलाईन पद्धतीने होत असलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी विश्वास पाटील असणार आहेत.

सत्तांतरानंतरच्या पहिल्याच ऑनलाईन सभेत राडा होण्याची शक्यता आहे. चार महिन्यात नफ्यात आणल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे, तर सत्ताधाऱ्यांनी तोटा वाढविल्याचा विरोधकांचा आरोप आहे. एक ना अनेक आरोप प्रत्यारोपावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे.

ऑनलाईन सभेत सत्ताधारी गटाचा 328 कोटींच्या जागा खरेदीचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांचा विरोध आहे. इतक्या मोठ्या रकमेच्या खरेदीचा प्रस्ताव ऑनलाइन सभेत का, असा सवाल यानिमित्ताने शौमिका महाडिक यांनी उपस्थित केला आहे.

संघाच्या ऑनलाईन सभेच्या आयोजनावरही शौमिका महाडिक यांनी टीका केली आहे. कोरोना काळात गोकुळ निवडणूक चालली मग ऑफलाईन सभा का नको, असा सवाल शौमिका महाडिक यांनी उपस्थित केला आहे. सत्ताधारी गट अनेक बाबीत दूध उत्पादकांची दिशाभूल करत असल्याचाही त्यांचा आरोप आहे.

गेल्या आठवड्यात सभेची विषयपत्रिका पाठवण्यात आली आहे, प्रश्नदेखील मागविण्यात आले होते, पण कुणीही प्रश्न पाठविलेले नाहीत. 324 कोटींच्या कर्जाचा मुद्दा गोकूळ सभासदांच्या हिताशी जोडत हा विषय खुल्या सर्वसाधारण सभेतच घ्यावा, अशी मागणी केल्याने आजच्या सभेत हा विषय मंजूर होणार का, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

दूध उत्पादकांना दोन रुपयांची दरवाढ देणार

गोळुळ दूध संघाची निवडणूक जिंकल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी दूध उत्पादकांना भेट दिली. यावेळी “दूध उत्पादकांनी चांगलं यश दिलं. त्यामुळे त्यांचे आभार मानतो. हा दूध संघ मल्टिस्टेटच्या माध्यमातून कोण्याच्या घशात जाऊ नये, ही आमची भावना आहे, असं म्हणत मुंबईत गोकुळचा दबदबा वाढणार आहे. शेतकऱ्यांना 2 रुपये दर वाढवून देणार आहोत. आमच्या शब्दात आम्ही कोठेही मागे पडणार नाही. दूध गोकूळ संघात प्रस्थापित व्यवस्था आहे. त्यातल्या उणिवा दूर करायच्या आहेत. आम्हाला थोडा वेळ द्या,” असं सतेज पाटील म्हणाले.

सत्तांतरानंतर ‘गोकुळ’ला अच्छे दिन

मार्केटिंग आणि दूध विक्रीसाठी नवी मुंबईत वाशीमध्ये जागा निश्चित करण्याचे आदेश अजित पवार यांनी सिडकोला दिले आहेत. त्यानुसार सिडकोची पाच एकर जागा गोकुळ दूध संघाला मिळणार आहे. सत्तांतरानंतर गोकुळ संचालक मंडळाने घेतलेल्या भेटीवेळी अजित पवार यांनी जागेसंदर्भात घोषणा केली. नव्या जागेमुळे मुंबईतही गोकुळचे प्रस्थ वाढणार आहे. संचालक मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे दिग्गज नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचीही यावळी भेट घेतली.

(Gokul First Online Meeting After Change in Power kolhapur Shaumika Mahadik aggressive live Updates )

हे ही वाचा :

सत्तांतरानंतर ‘गोकुळ’ला अच्छे दिन, अजित पवार यांची मोठी घोषणा

‘गोकुळ’ जिंकताच सतेज ऊर्फ बंटी पाटलांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना थेट 2 रुपये दरवाढ

डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार, आता मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार – सतेज पाटील

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.