आटपाडी डेपोला कुलुप, आंदोलन सुरुच राहणार, ठाकरे सरकारला इशारा, एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावर गोपीचंद पडळकर आक्रमक
भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या आटपाडी बस डेपोला कुलूप घातले आहे.
सांगली : भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या आटपाडी बस डेपोला कुलूप घातले आहे. एसटीचं जो पर्यंत विलीनीकरण होत नाही. तो पर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असा निर्धार पडळकर यांनी केला आहे
राज्य सरकारला आर्यन खानची काळजी
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे अशा वेळी ठाकरे सरकारमधील एक ही मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी गेला नाही, असा आरोप भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. मात्र, महाविकास आघाडीमधील मंत्री आर्यन खानची काळजी घेण्यामध्ये व्यस्त आहेत, असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला होता.
राज्य सरकारनं संपात फूट पाडली
गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन सुरू आहे. एसटीच्या प्रश्नावर काल राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. परंतु, राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये फूट पाडून संप मोडीत काढला आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटायला मंत्र्यांना वेळ नाही
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एसटी कर्मचाऱ्यांनं काल आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. आतापर्यंत राज्यात 28 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, आत्तापर्यंत राज्य सरकारचा एकही मंत्री आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेला नाही. त्यांना कोणतीही मदत केली नाही, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
इतर बातम्या :
Gopichand Padalkar angry over Thackray Government over MSRTC ST Workers issue close ST Depot of Aatpadi Sangli