अहमदनगर : नगर (Ahmednagar) तालुक्यातील दरेवाडी (Darewadi) इथल्या ग्रामपंचायत (Grampanchayat) पदाधिकाऱ्यांमध्ये राजकीय वादातून तुफान हाणामारी झालीय. त्यानंतर पोलीस (Police)ठाण्याच्या आवारातही दोन्ही गट समोरासमोर भिडले. शिवीगाळ करत राडा घालण्यात आला. या प्रकरणी सरपंच, उपसरपंचासह शिवसेना(Shiv Sena), भाजपा(BJP)च्या जिल्हा पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आलेत.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वाद
नगर तालुक्यातल्या दरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्या भावजय सरपंच तर भाजपाचेच अनिल करांडे उपसरपंच आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात राजकीय वाद सुरू झाले. या वादाचं पर्यवसान जोरदार राड्यात झालं.
पोलिसांनाही अरेरावी
वाद झाल्यावर दोन्ही गट भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता तिथंही दोन्ही गटात पोलिसांसमोर जोरदार वाद झाला. एकमेकांना शिवराळ भाषा वापरण्यात आली. पोलिसांनाही अरेरावी करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्या आहेत.