द्राक्षव्यापारी शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी जात होते, कोट्यवधी रुपयांची रक्कम लुटली; पोलिसांनी असा लावला छडा

गणेश कॉलनी येथे मंगळवारी द्राक्ष व्यापारी महेश केवलानी आणि त्यांच्या चालकाला मारहाण करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी लुटल्याचा प्रकार घडला आहे.

द्राक्षव्यापारी शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी जात होते, कोट्यवधी रुपयांची रक्कम लुटली; पोलिसांनी असा लावला छडा
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 7:40 AM

सांगली : द्राक्षव्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदी केले. त्यानंतर ते शेतकऱ्यांची रक्कम देण्यासाठी जात होते. त्यांच्याजवळ एक कोटी १० लाख रुपयांची रक्कम होती. स्कार्पिओ गाडीतून व्यापारी चालकासोबत होते. तेवढ्यात त्यांची गाडी अगवण्यात आली. शस्त्राचा धाड दाखवण्यात आला. शस्त्र पाहून व्यापारी घाबरले. त्यांनी स्वतःजवळची रक्कम देऊन जीव वाचवला. त्यानंतर तीन आरोपी युवक पळून गेले. या प्रकरणाची तक्रार व्यापाऱ्याने पोलिसांकडे केली. पोलिसांनी पथकं तयार करून आरोपींचा शोध घेतला. तीन संशयित आरोपी सापडले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

स्कॉर्पिओ गाडी अडवून लुटले

तासगावच्या दत्तमाळ येथील वसंतदादा महाविद्यालयात शेजारी असणाऱ्या गणेश कॉलनी येथे मंगळवारी द्राक्ष व्यापारी महेश केवलानी आणि त्यांच्या चालकाला मारहाण करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी लुटल्याचा प्रकार घडला आहे. सुमारे 1 कोटी 10 लाखांची रक्कम लंपास करण्यात आली होती. मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. केवलानी यांची स्कॉर्पिओ गाडी अडवून हा लुटीचा प्रकार करण्यात आला होता.

एक कोटी १० लाख रुपयांची रक्कम

केवलानी हे द्राक्ष व्यापारी आहेत. द्राक्ष खरेदी केल्यानंतर तासगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी 1 कोटी 10 लाखांचा रक्कम ते घेऊन आले. अज्ञात चोरट्यांनी गाडी अडवून मारहाण करत ही रक्कम लुटली होती. या घटनेनंतर सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तीन पथके देखील नेमली होती. सांगली जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

आरोपींकडून शस्त्र आणि रोकड जप्त

तासगाव तालुक्यातील याच मनेराजुरी येथील शिकोबा डोंगराच्या पायथ्याला काही संशयित व्यक्ती थांबल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा मारून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे काही शस्त्र आणि रोकडे आढळून आली. तिघांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरची रक्कम ही तासगाव शहरातल्या द्राक्ष व्यापाऱ्यांकडून लुटल्याचा सांगितले.

अशी आहेत आरोपींची नावे

यावेळी त्यांच्याकडून एक कोटी नऊ लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली. नितीन यलमार, (वय 22 वर्षे), विकास पाटील, (वय 32 वर्षे आणि अजित पाटील,(वय 22 वर्षे) अशी तिघा संशयितांची नावे आहेत.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.