Gadchiroli Tiger | मैत्रिणीला घेऊन एकांतात जंगलात फिरायला गेला; गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात तरुण ठार, तरुणी जखमी
हसमुख चेहऱ्यांनी जंगलात दाखल झालेला अजय कधी विचार नाही केला की या जंगलातून माझा शव बाहेर निघेल. मैत्रीसह जंगलात गेलेल्या तरुणाला वाघाने हल्ला करून ठार केले. ही खळबळजनक घटना देसाईगंज तालुक्यातील शिवराज उसेगाव रस्त्यावर घडली.
गडचिरोली : अजय नाकाडे (Ajay Nakade) चारचाकी वाहनाने का मित्र-मैत्रिणी उसेगाव (Usegaon) येथील जंगलात गेला होता. अजयचा मित्र चारचाकी वाहनात बसून होता. हे दोघे जंगलात फिरायला गेले. जंगलात फिरत (walking in the forest) असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक अजय नाकाडेवर हल्ला केला. हा किल्ला एवढा मोठा होता की, मैत्रिणीने वाघाला हल्ल्यापासून दूर करण्यास अनेक प्रयत्न केले. परंतु मुलीवरही वाघाने दोन-तीन वार करुन तिला जखमी केले. त्यानंतर पुन्हा वाघाने झडप घेत अजयवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात अजय तिथेच जागीच ठार झाला. हे सर्व थरारक घटना बघत असलेली तरुणी जखमी होऊन जंगलाच्या बाहेर आरडाओरडा करत बाहेर निघाली. तेव्हा तेथील स्थानिकांनी वाघाला काड्यांचे सहाय्याने पळवून लावले. तोपर्यंत अजयचा मृत्यू झालेला होता.
तरुणी रुग्णालयात दाखल
हसमुख चेहऱ्यांनी जंगलात दाखल झालेला अजय कधी विचार नाही केला की या जंगलातून माझा शव बाहेर निघेल. मैत्रीसह जंगलात गेलेल्या तरुणाला वाघाने हल्ला करून ठार केले. ही खळबळजनक घटना देसाईगंज तालुक्यातील शिवराज उसेगाव रस्त्यावर घडली. ताबडतोब रुग्णवाहिका व पोलीस विभागाला मदत मागण्यात आली. त्यानंतर पोलीस विभाग घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने मृतक अजयचा शव बाहेर काढला. जखमी असलेल्या मैत्रीणीला सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
प्रेमसंबंधातील मुलाखत जीवावर
प्रेमसंबंधातून झालेली मुलाखात जीवावर येईल, अजयला असं कळलं नव्हतं. अजयने कधी विचारही केला नव्हता की अशी घटना माझ्या आयुष्यात घडेल. हसमुख चेहऱ्याने अजय चारचाकी वाहनात बसून उसेगाव जंगल परिसरात पोहोचला होता. परंतु त्या जंगलातून त्याचा मृतदेहच बाहेर निघाला.