Nanded Rain | नांदेड जिल्हात पावसाचा हाहा:कार अनेक गावांचा संपर्क तुटला, शहरातील रस्ते पाण्याखाली…

नांदेड जिल्हात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याने प्रशासन अॅलर्ट मोडवर होते. अनेक गावाना जोडणाऱ्या या रस्त्याच्या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केलीयं. नदीला थोडा जरी पुर आला की, संपूर्ण रस्ताच पाण्याखाली जात असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटतो.

Nanded Rain | नांदेड जिल्हात पावसाचा हाहा:कार अनेक गावांचा संपर्क तुटला, शहरातील रस्ते पाण्याखाली...
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 8:24 AM

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) काल झालेल्या मुसळधार पावसाने नायगाव तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. पळसगांव, टाकळगाव, ताकभिड या गावांचा संपर्क तुटला होता तर देगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी (Water) आले होते. त्यामुळे संध्याकाळी घरी येणाऱ्या विद्यार्थ्यांसह असंख्य शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागलाय. थोड्याश्या पावसाने (Rain) इथल्या रस्त्यावर पाणी साचत असल्याने हा रस्ता पावसाळयात डोकेदुखी बनलाय. त्याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही काहीही उपयोग होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

नांदेड जिल्हात मुसळधार पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला

नांदेड जिल्हात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याने प्रशासन अॅलर्ट मोडवर होते. अनेक गावाना जोडणाऱ्या या रस्त्याच्या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केलीयं. नदीला थोडा जरी पुर आला की, संपूर्ण रस्ताच पाण्याखाली जात असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटतो. इतकेच नाही तर विद्यार्थ्यांना पावसानंतर आपले घर गाठण्यासाठी मोठी तारेवरची कसरत नेहमीच करावी लागते. ग्रामस्थांनी पुलाची उंची वाढवावी अशी मागणी अनेकदा प्रशासनाकडे केलीयं. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते.

हे सुद्धा वाचा

हिंगोली गेट भुयारी पुलाखाली पाणी साचल्याने वाहतूक बंद

नांदेड शहरात कालपासून जोरदार पाऊस बरसतोय. त्यामुळे शहरातील अनेक पूल पाण्यात बुडाले आहेत. हिंगोली गेट इथल्या रेल्वेच्या पुलाखाली पाणी साचल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलायं. त्यासोबतच अनेक भुयारी पुलाखाली पाणी साचलेले आहे. शहरात यावर्षी नालेसफाई झालीच नसल्याने सखल भागातील अनेक घरांत पाणी शिरून सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झालेय. दरवेळी प्रमाणे यंदाही महापालिकेने पावसापूर्वी नालेसफाई केल्याचा दावा केला होता. मात्र, पावसामध्ये शहरातील अनेक नाले तुंबल्याचे चित्र आहे. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.