Raigad rain update : संपूर्ण रायगड जिल्ह्यात पावसाचं थैमान, नद्या ओव्हर फ्लो, माथेरान अंधारात

मुसळधार पावसाने कोकणसह रायगडला झोडपून काढलं आहे. रायगड जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. ओढे, नद्या-नाल्यांनी पात्रं सोडली आहेत. बाळगंगा नदी, पटलगांगा नदी, भोगावती नदी, दादरखाडी ओवरफ्लो झाल्या आहेत.

Raigad rain update : संपूर्ण रायगड जिल्ह्यात पावसाचं थैमान, नद्या ओव्हर फ्लो, माथेरान अंधारात
Raigad Balganga river overflow-
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 1:45 PM

रायगड : मुसळधार पावसाने कोकणसह रायगडला झोडपून काढलं आहे. रायगड जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. ओढे, नद्या-नाल्यांनी पात्रं सोडली आहेत. बाळगंगा नदी, पटलगांगा नदी, भोगावती नदी, दादरखाडी ओवरफ्लो झाल्या आहेत. या नदींचे पाणी घराघरात घुसलं आहे. पेण तालुक्यातील रावे आणि साई गाव इथे पूरसदृश्य परिस्थिती आहे. माथेरानमध्ये जोरदार पाऊस कोसळत असून इथे दोन तासांपासून वीजपुरवठा बंद आहे. पनवेल, पेण या भागाला पावसाने झोडपलं आहे. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. (Heavy rain in Raigad, Ratnagiri, Sindhudurg Konkan rain update today)

पेण तालुक्यातील बऱ्याच गावांना फटका बसला आहे. जोहे-तांबडशेत रस्ता पाण्याखाली गेला आहे. जोहे-कळवे परिसरातील सर्व भात शेती पाण्याखाली गेली आहे. जोहे विभागातील गणपती कारखान्यांत पाणी घुसलं आहे. अचानक पाण्याची पातळी वाढल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गणपतींच्या मुर्त्या सुद्धा भिजल्या आहेत.

बाळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली

बाळगंगा नदीच्या पुरामुळे पुलावरुन पाणी वाहत आहे. डोणवत धरणाच्या पाण्यातून निघणाऱ्या बाणगंग नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पेण तालुक्यातील मायनी गावाकडे जाणाऱ्या पुलावरुन पाणी जात असल्याने दोन्ही बाजूला नागरिक पाणि कमी होण्याची वाट पाहत बसले आहेत.

रस्त्यावर दरड कोसळली

वडवली ते दिघी रस्त्यावर कुडगाव हद्दीत रस्त्यावर दरड कोसळली. दरड हटवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाने ( नानवली मार्गे) वाहतूक सुरू आहे. माणगाव- म्हसळा मार्गावर मोरबाच्या पुढे माणगाव तालुका हद्दीत रस्त्यावर दरड कोसळली. स्थानिकांनी दिघी माणगाव रोड बनवत असताना प्रांताधिकारी शेडगेंकडे तक्रार केली होती. मोठ्या प्रमाणात डोंगर खोदलेले आहेत आणि तिथल्या जुन्या मोऱ्या सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाणी जाण्यासाठी मार्ग नाही. पाण्याने आपल्यासोबत डोंगराला रस्त्यावर आणले आहे. सध्या शासनातर्फे दरड हटविण्याचे काम सुरू आहे. पर्यायी मार्गाने (मांजरवणे) वाहतूक सुरू आहे.

हायवेवर पाणी

मुसळधार पावसाचा मुंबई गोवा वाहतुकीवर परिणाम झाला. पेणजवळ इथं महामार्गावर पाणी आलं. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या लेनवर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरून वाहतूक सुरू आहे.

कोकण रेल्वे ठप्प

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर थिविम -करमळी दरम्यान असलेल्या ओल्ड गोवा बोगद्यात चिखल, माती रेल्वेरुळावर आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाच गाड्यांचे मार्ग वळवण्यात आला असून पाच गाड्यातील प्रवाशांना ट्रान्सपर करण्यात आले आहे. मडगावकडे जाणार्‍या सर्वच गाड्या विविध स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे सलग चौथ्या दिवशी कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

सिंधुदुर्गात रेड अलर्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाटेपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा रिपरिप सुरू झाली असून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून रेड अलर्ट दिला आहे. सध्या जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच असून गेल्या 24 तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मि पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 167 मि.मि पाऊस कोसळला आहे.

VIDEO : रायगडमध्ये जोरदार पाऊस

संबंधित बातम्या  

Mumbai Rains Live Updates | पेणमधील सर्व गणपती कारखान्यांमध्ये पाणी शिरले, सर्व मूर्ती भिजल्या, लाखोंचं नुकसान

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.