बुलढाणा, नंदूरबारमध्ये जोरदार पाऊस; आजपासून ‘या’ जिल्ह्यांनाही गारपीठीसह फटका; हवामान खात्याचा अंदाज काय?

आजपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 ते 8 मार्चपर्यंत महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बुलढाणा, नंदूरबारमध्ये जोरदार पाऊस; आजपासून 'या' जिल्ह्यांनाही गारपीठीसह फटका; हवामान खात्याचा अंदाज काय?
फाईल चित्रंImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 9:33 AM

बुलढाणा : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काल बुलढाण्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर नंदूरबारमध्ये विजांच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे पिके धोक्यात आल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे. आजपासून राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात दमदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ठाणे जिल्ह्यातही सकाळपासून ढगाळ हवामान असल्याने पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार काल रात्री बुलढाण्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास अर्धा तास पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या रब्बी पिकांनाही धोका निर्माण झाला. 5 मार्च ते 7 मार्च दरम्यान जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. या अवकाळी पावसाने आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे रब्बी पिकांतील काढणीला आलेल्या गहु, हरबरा, मका, तसेच आंबा, फळे आणि पालेभाज्यांना फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.

हे सुद्धा वाचा

नंदूरबारमध्येही बॅटिंग

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात आणि परिसरात मध्यरात्री विजेच्या कडकडातसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. पाऊस काही काळ चालल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. हलक्या स्वरुपाचा पाऊस असल्यामुळे नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान होणार नसल्याची शक्यता आहे. मात्र ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांना काही प्रमाणावर फटका बसणार आहे. दरम्यान, नंदूरबारमधील तापमान दिवसाला 40 सेल्सिअसपर्यंत गेलं होतं. मात्र गेल्या दोन दिवसापासून तापमानात बदल झाला असून ढगाळ वातावरण झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे मका, पपई, केळी आणि उशिरा लावलेल्या गहू, हरभरा या पिकांवर काही प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गारपीठ होणार

राज्यात काही भागात गारपीठीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिमी चक्रवाताच्या वाढलेल्या प्रभावामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे वारे वाहत आहेत. त्याच्या परिणामामुळे उत्तर महाराष्ट्र, ठाणे, रायगड, पालघर आणि विदर्भात 8 मार्चपर्यंत विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता आहे. तर काही भागात 7 मार्चच्या आसपास गारपीट होईल, असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे.

विदर्भ, मराठवाड्याला फटका

आजपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 ते 8 मार्चपर्यंत महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळं पिकांना फटका बसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज आणि सोमवारी मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना येथेही हलक्या सरींची शक्यता आहे. विदर्भात सर्वत्र पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.

आज नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटांसह हलक्या सरींची तुरळक ठिकाणी शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात 6 मार्च पर्यंत अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. अवकाळी पावसामुळं पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. द्राक्ष काढणीला आल्याने त्यातच पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.