Wardha Rain : वर्ध्यात पावसाचा धुमाकूळ, वीज कोसळून दोघांचा मृत्यू, तर दोघे पुरात गेले पुरात वाहून

Wardha Rain : वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्याच्या पुलगाव येथील रामटेके लेआउट मध्ये 62 वर्षीय सुमन अरुणराव गजामे ही महिला शेतातून येत असतांना नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेली. काही अंतरावरच तिचा मृतदेह आढळला.

Wardha Rain : वर्ध्यात पावसाचा धुमाकूळ, वीज कोसळून दोघांचा मृत्यू, तर दोघे पुरात गेले पुरात वाहून
वर्ध्यात पावसाचा धुमाकूळ, वीज कोसळून दोघांचा मृत्यूImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 7:43 AM

वर्धा : वर्धा जिल्ह्यात (Wardha Rain) काल दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. तब्बल तीन तास आलेल्या पावसाने (Rain) जिल्ह्यात कहर माजावला. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालं आहे. ओढे आणि नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. या जोरदार पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पूर आल्याने नाल्याच्या पाण्यात दोघे वाहून गेले आहेत. वाहून गेलेल्या दोघांपैकी एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. तर दुसऱ्याचा शोध (Rescue Operations) सुरू आहे. आलेल्या पावसामुळे हजारो हेक्टर शेती सुद्धा पाण्याखाली गेली असल्याच प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अवघ्या तीन तासाच्या या पावसामुळे प्रचंड दाणादाण उडाल्याने स्थानिक नागरिक भयभती झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही स्थानिकांनी केली आहे.

वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्याच्या पुलगाव येथील रामटेके लेआउट मध्ये 62 वर्षीय सुमन अरुणराव गजामे ही महिला शेतातून येत असतांना नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेली. काही अंतरावरच तिचा मृतदेह आढळला. तर देवळी तालुक्यातीलच पिपरी खराबे येथील देवानंद किनाके हे जनावरे चरावायला गेले होते. परत येताना नाल्याला आलेल्या पुरात ते वाहून गेले असून त्यांचा शोध सुरु आहे. तर हिंगणघाट नांदगाव येथे शेतात काम करत असतांना वीज कोसळल्याने 36 वर्षीय गीता मेश्राम या महिलेचा मृत्यू झाला आहे. वर्धा तालुक्यातील कुरझडी श्रीराम शेंडे यांचा सुद्धा वीज कोसळल्याने मृत्यू झालाय. काल आलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या सर्व भागातील नाल्याना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. या पुरामुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

पुरामुळे मजूर अडकले

जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. पुलगाव रोडवरील धोत्रा नदीला पूर आल्याने दहा मजूर अडकले आहेत. घटनास्थळी सावंगी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मल्हारी ताळीकोटे आणी तहसीलदार रमेश कोळपे घटनास्थळी दाखल झाले आहेत. मजुरांना सुरक्षित काढण्याकरीता उपाययोजना करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. शेताततून परत येत असतांना अचानक पाणी वाढल्याने अनेक मजूर अडकले होते. त्यामुळे मजुरांनी नदी शेजारील उंच जागेवर उभे राहून स्वत:चा बचाव केला.

विद्यार्थी अडकले, शेतीचं तळं झालं

समुद्रपुर तालुक्यात काल सकाळपासून झालेल्या पावसामुळे मांडगाव येथे पूर आला असून मांडगाव व पेठ येथील संपर्क तुटला आहे. सकाळपासून शाळकरी विद्यार्थी पुरात अडकले असून घरी जाण्यासाठी पाणी ओसारण्याची वाट पाहत होते. 2 तासात झालेल्या पावसाने इतक्या मोठ्या प्रमाणात पूर आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शेतीचे सुद्धा फार नुकसान झाले असून शेतात पाण्याचे तळे साचले आहे .प्रवीण चांदनखेडे, उमेश कळमकर, गोपाल डफ, रत्नाकर ऐंडे याच्या शेतात पाणी साचून तळे साचले आहे. तर मांडगाव काही घरात सुद्धा पाणी घुसले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.