Hingoli : शंभर टक्के कोरोना लसीकरणाचं टार्गेट, तहसीलदारांकडून मृत ग्रामसेवकाला नोटीस, महसूलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

सेनगाव (Sengaon) तालुक्यातील तहसीलदार जीवनकुमार कांबळे (Jeevankumar Kamble ) यांनी चक्क मयत ग्रामसेवकाच्या नावाने कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) मोहीमेसाठी आदेश काढले आहेत.

Hingoli : शंभर टक्के कोरोना लसीकरणाचं टार्गेट, तहसीलदारांकडून मृत ग्रामसेवकाला नोटीस, महसूलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
सेनगाव तहसलीदार कार्यालय
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 7:56 AM

हिंगोली: जिल्ह्यातील सेनगाव (Sengaon) तालुक्यातील तहसीलदार जीवनकुमार कांबळे (Jeevankumar Kamble ) यांनी चक्क मयत ग्रामसेवकाच्या नावाने कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) मोहीमेसाठी आदेश काढले आहेत. लिंगीपिंपरी येथील ग्रामसेवक डी.डी. झिंगरे यांच सहा महिन्यापूर्वी निधन झालंय. मात्र, तहसीलदार यांनी आज आदेश काढल्याने सेनगाव तहसीलदार यांचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

100 टक्के लसीकरणाचं टार्गेट, मृत ग्रामसेवकाला नोटीस

हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक गांवात 100%लसीकरण व्हावं यासाठी मोहीम राबवली जात आहे. त्याकरिता ज्या गावात 75%पेक्षा कमी लसीकरण झाले अशा गावातील ग्रामसेवक, तलाठी, सरपंच यांच्या सह इतर कर्मचाऱ्यांना नोटीसा बाजवण्यात आल्या आहेत.मात्र, सेनगाव येथील तहसीलदार जीवन कुमार कांबळे यांनी चक्क सहा महिन्यापूर्वी मयत झालेल्या ग्रामसेवकाच्या नावे आदेश काढले असल्याचे समोर आले आहे.

सेनगावात गावनिहाय पथकं स्थापन

कोरोना ओमिक्रॉन व्हेरीयंटचा वाढत असेला प्रादुर्भाव लक्षात घेता. खबरदारी म्हणून 100%लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.त्या अनुषंगाने औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या आढावा बैठकीत आगामी एका आठवड्यात 100%लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी सेनगाव तहसील विभागामार्फत गाव निहाय क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी यांचे पथक स्थापित करण्यात आले आहे. ज्या गावात 75%पेक्षा कमी लसीकरण झाले अशा गावात घरोघरी जाऊन लसीकरण संधर्भात जागृती करावी असे काढले आहेत.

सेनगाव तहसील विभागा मार्फत काढण्यात आलेल्या आदेशात 6 महिन्यापूर्वी मयत झालेले पिंपरी येथील ग्रामसेवक डी.डी.झुंगरे यांच नाव आल्याने तहसील विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय. मयत ग्रामसेवक डी. डी. झिंगरे लिंगापिपरी येथे ग्रामसेवक पदावर काकार्यरत होते मात्र त्यांच पाच सहा महिन्यापूर्वी निधन झालं होत.चांगले कर्मचारी म्हणून अशी त्यांची ओळख होती. मात्र, सेनगाव तहसीलदार यांनी मयत ग्रामसेवक यांच्या नावे कोरोना लसीकरण मोहिमेचे आदेश काढल्यानं संताप व्यक्त करण्यात आलाय.

इतर बातम्या:

चालू आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात तेजी, काय आहेत आजचे दर?

Maharashtra News Live Update : नाशिकमध्ये सुरू झालेली सिटीलिंक स्मार्ट शहर बससेवा तोट्यात

Hingoli Sengaon Magistrate Jeevankumar Kamble sent notice to died village officer

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.