एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा कधी? हिंगोलीत असंतोषातून वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासांठी संप सुरु केला आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या प्रमुख मागणीसाठी संप सुरु आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा कधी? हिंगोलीत असंतोषातून वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 3:33 PM

हिंगोली: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासांठी संप सुरु केला आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या प्रमुख मागणीसाठी संप सुरु आहे. एसटीचे कर्मचारी 27 ऑक्टोबरपासून संपावर गेले आहेत. राज्य सरकारनं महागाई भत्ता वाढवत संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसटीच्या विलिनीकरण या प्रमुख मागणीकडे कुणी लक्ष देत नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यातील एसटी वाहकानं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या संबंधित वाहकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आंदोलनाकडे लक्ष दिलं जात नसल्यानं आत्महत्येचा प्रयत्न

एसटी कर्मचाऱ्यांचा संप राज्यातील 59 पेक्षा अधिक आगारांमध्ये आंदोलन सुरु आहे. आंदोलनाकडे कुणीच लक्ष देत नसल्याने हिंगोलीतील वाहकानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रमेश टाळीकुटे अस आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वाहकाचं नाव आहे. रमेश थोरात कळमनुरी आगारात वाहक म्हणून कार्यरत आहेत. हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात वाहकावर उपचार सुरू आहेत.

एसटी कामगार संघटनेची पुण्यात बैठक

एसटी संपाबाबत एसटी कामगार संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची पुण्यात बैठक सुरु आहे. पुण्यातील खराडीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आलंय. बैठकीत संपाबाबत पुढील दिशा ठरवली जाणार आहे. एस टी कामगार संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सुरू आहे.

जळगाव आगारात काम बंद आंदोलन

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. जळगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी देखील काम बंद आंदोलन पुकारले असून बस सेवा दिवाळीच्या काळात ठप्प झाली आहे. आज दुपारी बारा वाजेपासून बसेस एसटी आगारात उभ्या आहेत, त्यामुळे प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत.आज फक्त एसटी बसेस बंद आहेत, उद्यापासून आम्ही परिवारासह रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाला दिला आहे

इतर बातम्या:

पूर्वी परातीत चहा यायचा नंतर कप आले, त्याचा कान तुटलेला, ती परिस्थिती सहकार क्षेत्रानं बदलली: शरद पवार

पाकिस्तानी नौदलाचा गुजरात किनाऱ्यावर गोळीबार, एका भारतीय मच्छिमाराची हत्या

Hingoli ST Conductor trying to commit suicide by taking poison due to government not accept demands of ST workers

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.