मी गुवाहाटीला असताना चांगले निर्णय घेतले, एकनाथ शिंदे यांनी सांगितलं
विद्यार्थ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे. चार-पाच महिन्यांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
रत्नागिरी : ज्याचा निश्चय चांगला असतो त्याचा विजय नक्की असते. हे मला करायचं आहे, यासाठी आत्मविश्वास ठेवा. अभ्यास चांगला ठेवा.पण, त्याचबरोबर आत्मविश्वासदेखील महत्त्वाचा आहे. हे मला करायचं म्हणजे करायचंच. ही भावना मनामध्ये ठेवा. तुम्हाला कोणी हलवू शकणार नाही. हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. हे सर्व घटकांचं सरकार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हे शेतकरी, कामगार, शिक्षक यांचं सरकार आहे. तुम्हाला वाटतं की, नाही. हा आपला मुख्यमंत्री आहे म्हणून, असा प्रश्न विचारला. त्यावर चांगला प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे. चार-पाच महिन्यांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी केले. या राज्यातला प्रत्येक घटक सुखी झाला पाहिजे, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
तुमचा राजकारणाशी संबंध नाही. पण, सगळं राजकारण बरोबर कळते. कोण राज्यकर्ते चांगले आहेत. ४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. स्कील डेव्हलपमेंट सेंटर तयार झालं असल्याचं त्यांनी सांगितलं.
सरकारनं गेली अनेक वर्षे भरती रोखली होती. ७५ हजार नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला. दोघेचं होतो. उद्योगांना सवलती देण्याचं ठरविलं. रोजगार मिळाला पाहिजे. तुम्हाला मदत होईल, अशी भूमिका आपली आहे.
इंफोसिस कंपनीनं सीएसआरच्या माध्यमातून चार हजार कोर्सेस विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट शिकवितात. राज्यात ४० लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
सिंचन प्रकल्प वाढवणे, पर्यटनाला चालना देणे, गडकिल्ले संवर्धन करणे महत्त्वाचं असल्याचं शिंदे म्हणाले. कोकणासाठी तरतुदी कराव्यात. बॅकलॉग भरुन काढावा. मत्स्य व्यवसाय चालना द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.