गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी येथे माजी पालकमंत्र्याच्या (Former Guardian Minister) बंगल्यावर ड्युटीवर असलेल्या जवानाने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. हितेश भाईसारे हे प्राणहिता उपपोलीस मुख्यालयात (Pranhita Sub Police Headquarters) कार्यरत होते. काल रात्रीपासून माजी पालकमंत्री अमरीशराव आत्राम यांच्या बंगल्यावर ड्युटीवर होता. आज साडेदहा वाजता स्वतःच्या बंदुकीने गोळ्या घालून आत्महत्या केली. माजी पालकमंत्र्यांच्या बंगल्यासमोर सदर घटना घडली. जवान तणावात असल्याची प्राथमिक माहिती आहे. भाजप पक्षाचे वरिष्ठ नेता व माजी पालकमंत्री अमरीशराव आत्राम (Amrishrao Atram) हे अहेरी येथील राजघराण्यातील राजकारणी आहेत. त्यांच्या घरासमोर आत्महत्या करणे एक चर्चेचा विषय बनलेला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, काही कौटुंबिक तणावात आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याची चौकशी व्हावी अशी चर्चा गडचिरोली पोलीस विभागातील अनेक पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. नेमकं प्रकरण काय यावर पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन अहेरी चौकशी करीत आहेत. अशा अनेक घटना गडचिरोली जिल्ह्यात घडलेल्या आहेत. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त भागात असल्यामुळे पोलिसांना गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात जंगलात ऑपरेशन करावे लागते.
वीस-पंचवीस किलोमीटर पायदळ प्रवास करावा लागतो. अशावेळेस मानसिक असंतुलन बिघडल्याने जवानांवर तणाव असतो. काही कौटुंबिक तणाव असल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यात तीन ते चार घडलेली आहे. परंतु देशाची सुरक्षा करणारे जवान तणाव दूर करण्यासाठी गृहमंत्रालयाने काही उपाय योजना केली पाहिजे. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्टी मागितल्यानंतरही सुट्टी मिळत नाही, अशी चर्चा ही पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती. यावर योग्य ते निर्णय गृह मंत्रालय किंवा पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी घेईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.