Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये किरकोळ वादातून बंदुक रोखली, सहा जणांवर गुन्हा दाखल
पाथर्डी तालुक्यातील तोंडळी गावात फिर्यादी किरण विश्वनाथ दरेकर आणि आरोपी राहतात. आरोपीची जनावरे दरेकर यांच्या शेतात बांधल्याने त्यांनी आरोपीला जाब विचारला. जाब विचारल्याचा राग आल्याने आरोपी विकास भिसे याने वडिलांची लायसन्सधारी बंदुक आणून दरेकर यांच्यावर रोखली.
अहमदनगर : किरकोळ कारणावरुन झालेल्या वादा (Dispute)त बंदुकी (Gun)चा धाक दाखवल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील तोंडळी गावात घडली आहे. आमच्या शेतात जनावरे का बांधली अशी विचारणा केली असता शेजारील शेतकऱ्याने वडिलांची लायसन्सधारी बंदुक आणत दहशत पसरवली. विकास भिसे असे बंदुक दाखवून दहशत पसरविणाऱ्या आरोपीचे नाव आहे. सदर बंदुक विकासचे वडील रामकिसन भिसे यांच्या नावे आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (In Ahmednagar, a farmer was scared of a gun during a dispute)
जनावरे शेतात बांधल्याचा जाब विचारल्याने रोखली बंदुक
पाथर्डी तालुक्यातील तोंडळी गावात फिर्यादी किरण विश्वनाथ दरेकर आणि आरोपी राहतात. आरोपीची जनावरे दरेकर यांच्या शेतात बांधल्याने त्यांनी आरोपीला जाब विचारला. जाब विचारल्याचा राग आल्याने आरोपी विकास भिसे याने वडिलांची लायसन्सधारी बंदुक आणून दरेकर यांच्यावर रोखली. तसेच तुम्हाला जिवंत ठार मारुन टाकेल अशी धमकी दिली. या घटनेमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आरोपीने थेट बंदुक दाखवल्याने एकच खळबळ उडली. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजविणाऱ्या एकाला अटक
जळगाव शहरातील मासूमवाडी येथील आठवडे बाजार परिसरात दोन गावठी पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अली उर्फ डॉलर शाहरुख शकील अली असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गावठी पिस्तुल विक्री करण्याच्या इराद्याने घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पो.ना. सुधिर सावळे, पो.ना. हेमंत कळसकर आणि पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांना मिळाली. त्यानुसार लागलीच मासूमवाडी येथील आठवडे बाजारातून आरोपी अली उर्फ डॉलर शाहरुख शकील अली हा संशयास्पद हालचाली करत असताना आढळून आल्याने त्याला पाठलाग करून अटक केली. In Ahmednagar, a farmer was scared of a gun during a dispute)
इतर बातम्या
Lady Don | विवाहित बहिणीला भेटणाऱ्या तरुणाला ट्रकसमोर फेकलं, लेडी डॉनच्या मुसक्या आवळल्या