धक्कादायक ! आधी पत्नी आणि मुलाची हत्या केली, मग हत्येचे व्हिडिओ फोटो स्टेटसला ठेवले; वाचा नेमके काय घडले ?

कहर म्हणजे आरोपीने या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो काढून स्वतःच्या व्हॉटस्ॲप स्टेटसला ठेवले आणि दिघी गावातील काही लोकांना पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली. बलराज दत्तात्रय कुदळे या आरोपीला श्रीरामपूर तालुका पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

धक्कादायक ! आधी पत्नी आणि मुलाची हत्या केली, मग हत्येचे व्हिडिओ फोटो स्टेटसला ठेवले; वाचा नेमके काय घडले ?
धुळ्यात झोपडी जळाल्याने तीन वर्षाच्या चिमुकल्याचा होरपळून मृत्यूImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 4:16 PM

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. किरकोळ पैशाच्या वादा (Money Dispute)तून पतीनेच पत्नीच्या डोक्यात कुदळ घालून तर मुलाला झाडाला फासावर लटकावून त्यांची हत्या (Murder) केल्याचे धक्कादायक कृत्य समोर आले आहे. कहर म्हणजे आरोपीने या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो काढून स्वतःच्या व्हॉटस्ॲप स्टेटसला ठेवले श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथे एका नराधमाने पत्नीशी पैशांच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून पत्नी आणि चिमुकल्या मुलाची निर्दयीपणे हत्या केली. अक्षदा बलराज कुदळे (28) आणि शिवतेज बलराज कुदळे (4) अशी मयतांची नावे आहेत. बलराज दत्तात्रय कुदळे असे माथेफिरु आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (In Ahmednagar a husband killed his wife and child in a money dispute)

हत्येचे व्हिडिओ, फोटो स्टेटसला ठेवले

आरोपी बलराज कुदळे हा पत्नी अक्षदा कुदळे आणि मुलगा शिवतेजसह श्रीरामपूर तालुक्यातील दिघी गावात राहत होते. आरोपीचे पैशावरुन पत्नीसोबत वाद झाले. याच वादातून त्याने पत्नीच्या डोक्यात कुदळीने घाव घालून ठार केले, तर मुलाला झाडाला फाशी देत मारून टाकले. कहर म्हणजे आरोपीने या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो काढून स्वतःच्या व्हॉटस्ॲप स्टेटसला ठेवले आणि दिघी गावातील काही लोकांना पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली. बलराज दत्तात्रय कुदळे या आरोपीला श्रीरामपूर तालुका पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. तर नराधम आरोपी बलराज दत्तात्रय कुदळे हा माथेफिरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या दोन्ही हत्या केल्याची कबुली त्याने दिली असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून बलराज याला अटक केली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या दुहेरी हत्याकांडाने अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (In Ahmednagar a husband killed his wife and child in a money dispute)

इतर बातम्या

Gujarat Blast | रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट, सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

BEST Bus Accident | बेस्ट बसची धडक, मुंबईत 29 वर्षीय बाईकस्वाराचा मृत्यू

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.