कामावर उशिरा का आल्याचा जाब विचारला; कामगाराने मालकीणीसोबत केले हे धक्कादायक कृत्य

| Updated on: Apr 01, 2023 | 8:32 AM

मला उशिरा येण्यामागचे कारण का विचारते. म्हणून कामगार संतापला. या संतापाच्या भरात त्याने सोबत आणलेला चाकू काढला.

कामावर उशिरा का आल्याचा जाब विचारला; कामगाराने मालकीणीसोबत केले हे धक्कादायक कृत्य
Follow us on

अहमदनगर : ताराबाई चंदन या ७२ वर्षीय वयोवृद्ध महिला. त्यांचा विवेक आर्ट्स हा गणपती तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात काही कामगार काम करतात. कधी-कधी कामगार उशिरा येतात. त्याचे कारण त्या विचारतात. एवढ्याशा गोष्टीचा एका कामगाराला राग आला. मला उशिरा येण्यामागचे कारण का विचारते. म्हणून कामगार संतापला. या संतापाच्या भरात त्याने सोबत आणलेला चाकू काढला. त्या चाकूने सपासप वार करून वयोवृद्ध महिलेला गंभीर जखमी केले.

कामावर उशिरा येण्याचे कारण विचारले

ताराबाई चंदन यांनी कामावर उशिरा का आला याचा जाब या कामगाराला विचारला. यावरून संतापून कामगाराने थेट मालकीणीला यमसदनी पाठवले. ही घटना अहमदनगरला श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे घडली. कोळगाव येथे विवेक आर्टस् या गणपती मूर्ती बनवण्यच्या कारखाना आहे. या कारखान्यातील मयूर भागवत या मूर्ती कारागिराने शुल्लक कारणावरून कारखान्याच्या मालकीणीला ठार केले.

YouTube video player

हे सुद्धा वाचा

ताराबाई यांचा उपचारादरम्यान मृ्त्यू

ताराबाई काशिनाथ चंदन या 72 वर्षीय वयोवृद्ध महिलेवर चाकूने वार केले. यात ताराबाई गंभीर जखमी झाल्या होत्या. गंभीर जखमी अवस्थेत ताराबाई यांना अहमदनगर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणले होते.उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

मयूरला भोगावे लागणार परिणाम

याप्रकरणी मयूर संजय भागवत यांच्या विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बेलवंडी पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले आहे. आता रागाचा हिशोब त्याला चुकता करावा लागणार आहे. शुल्लक कारणावरून त्याने चाकू काढला. पण, त्याचे परिणाम आता त्याला भोगावे लागणार आहेत.

मयूरच्या कुटुंबाचे काय होणार?

मालकाचं काम निघालं नाही तर तो बोलणारचं. पण, आपली चूक असताना दुसऱ्यावर रुबाब दाखवण्यात काही अर्थ नसतो. पण, काही जणांचा याचा राग येतो. हा राग शेवटी जीवनाची माती करतो. आता मयूरला जेलमध्ये जावे लागेल. त्याची शिक्षा त्याला मिळेल. त्याचं कुटुंब यामुळे उद्ध्वस्त होईल.