Chandrapur : चंद्रपुरात शेवाळामुळे पाय घसरून पडला, जलपर्णीत अडकल्याने मृत्यू, आज अखेर मृतदेहच सापडला

तासाभराच्या प्रयत्नानंतर जलपर्णीत अडकलेला नंदलालचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोस्टमार्टमसाठी मृतदेह रुग्णालयात रवाना केला गेलाय.

Chandrapur : चंद्रपुरात शेवाळामुळे पाय घसरून पडला, जलपर्णीत अडकल्याने मृत्यू, आज अखेर मृतदेहच सापडला
चंद्रपुरात शेवाळामुळे पाय घसरून पडला, जलपर्णीत अडकल्याने मृत्यूImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 8:07 PM

चंद्रपूर : जिल्ह्यात जुनोना तलाव परिसरात नाला पार करताना काही ग्रामस्थ रापट्यावर शेवाळ असल्याने पाण्याच्या प्रवाहासोबत नाल्यात पडले. मात्र त्यातील दोघे जलपर्णीमुळे (Jalparni) अडकून पडले. यातील एकाला वाचविण्यात यश आले. मात्र दुसरा दुसऱ्याला वाचवता न आल्याने त्याचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यात रोज पाऊस बरसतो आहे. त्यातच आपल्या शेतीकडे हे तीन ग्रामस्थ निघाले होते. नाल्याच्या कच्च्या रपट्यावर शेवाळ असल्याने त्यातील एक घसरून प्रवाहात पडला. अन्य दोघांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दरम्यान दुसराही वाहू लागला. त्याला कसेबसे वर काढले. मात्र त्यापैकी एकाला वाचविण्यात अपयश आले. हा सर्व व्हिडिओ आता पुढे आला. नंदलाल कैथवास (Nandlal Kaithwas) ( संतोषी वॉर्ड, (Santoshi Ward) बल्लारपूर) असे या बुडालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

वेस्ट वेअर भागात पाय घसरला

ग्रामस्थांनी संध्याकाळी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधार पडल्याने त्यात यश आले नाही. आज सकाळी जिल्हा आपत्ती दलाच्या जवानांच्या मदतीने त्याला शोधले जाणार आहे. त्यासाठी जेसीबी घेऊन एक पथक रवाना झाले. मात्र जीवन आणि मृत्यू या मधला संघर्षाचा हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. जलपर्णीत वाहून गेलेल्या नंदलाल कैथवास याचा मृतदेह अखेर बाहेर काढण्यात आलाय. चंद्रपूर शहरालगत जुनोना तलावाच्या वेस्ट वेअर भागात पाय घसरल्याने नंदलाल जलपर्णीत अडकला होता. त्याच्यासोबत असलेल्या अन्य दोघांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या दोघांनाही पाण्याच्या प्रवाहाने जलपर्णीत ओढले होते.

संतोषी वॉर्डावर शोककळा

ग्रामस्थांनी अनेक प्रयत्न करूनही नंदलाल कैथवास याचा शोध लागलेला नव्हता. अखेर आज सकाळी आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी ‘वूड क्रेन’ च्या मदतीने शोध अभियान सुरु केले होते. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर जलपर्णीत अडकलेला नंदलालचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोस्टमार्टमसाठी मृतदेह रुग्णालयात रवाना केला गेलाय. हे तिघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यंत्रणा कामाला लागली होती. मात्र शोधकार्यात अखेर नंदलालचा मृतदेहच आढळल्याने बल्लारपूर शहरातील संतोषी वॉर्डावर शोककळा पसरली आहे.

हे सुद्धा वाचा

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.