गडचिरोली : नवेगाव मार्गावर स्कूल व्हॅन आणि ट्रकचा (school van and truck) भीषण अपघात झाला. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेगाव परिसरात (Navegaon campus) ही घटना घडली. राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना ट्रक आणि बसमध्ये अपघात झाला. बस रस्त्यावर पलटली तर ट्रक दुसऱ्या बाजूला जाऊन शिरला. अपघातात जीवितहानी झाली नाही. परंतु, बसमध्ये असलेले विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. भरधाव ट्रकने विद्यार्थ्यांना नेणाऱ्या शाळेच्या व्हॅनला धडक दिली. या अपघातात दहा विद्यार्थी जखमी झाले. गडचिरोलीत नवेगाव खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना नेणारी व्हॅन पंचर झाल्यानंतर दुरुस्तीसाठी उभी होती. छत्तीसगडहून येणा-या ट्रकने व्हॅनला धडक दिली. त्यानंतर व्हॅन पलटली. त्या व्हॅनमध्ये असलेले दहा विद्यार्थी जखमी ( ten students injured) झालेत. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
पंचर झालेली व्हॅन रस्त्याच्या बाजूला उभी होती. ट्रकने व्हॅनला धडक दिली. यात दहा विद्यार्थी जखमी झाले. त्यापैकी चार विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव परिसरात घडली. उभ्या व्हॅनला धडक दिल्यानं ट्रकचालकाविरोधात रोष व्यक्त केला जातोय.
पाहा व्हिडीओ
गडचिरोलीत ट्रकच्या धडकेत दहा विद्यार्थी जखमी झालेत. pic.twitter.com/7YTprVpMKx
— Govind Hatwar (@GovindHatwar) March 31, 2022
या व्हॅनमध्ये दहा विद्यार्थी होते. त्यापैकी चार जण गंभीर जखमी आहेत. त्यांनी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालायत दाखल करण्यात आलंय. व्हॅन एकाच ठिकाणी उभी असल्यानं व्हॅन पलटली. त्यात असलेले विद्यार्थी जखमी झालेत.