Nanded Suicide : नांदेडमध्ये दुहेरी आत्महत्या, कौटुंबिक कारणातून गळफास घेत दोन महिलांनी जीवन संपवले
शिल्पा जिरोनकर यांच्या आत्महत्ये प्रकरणी त्यांच्या भावाच्या तक्रारीवरुन त्यांचे पती गजानन जिरोनकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. शिल्पा यांना हुंड्यासाठी सासरी त्रास दिला जात होता असे त्याच्या भावाने तक्रारीत म्हटले आहे. याच त्रासातून शिल्पाने बाथरुममधील शॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे.
नांदेड : विविध कारणातून दोन महिलांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज नांदेडमध्ये घडली आहे. शिल्पा जिरोनकर(Shilpa Jironkar) आणि अनुपमा मापारे(Anupama Mapare) अशी गळफास घेत आत्महत्या केलेल्या महिलांची नावे आहेत. पहिली घटना शहरातील विवेकनगर येथे तर दुसरी घटना शिवाजीनगर परिसरात घडली आहे. यापैकी शिल्पा जिनोरकर यांचे पती वकील आहेत तर अनुपमा मापारे यांचे पती डॉक्टर आहेत. दोन्ही घटनांची पोलिसात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. शिल्पा जिरोनकर यांच्या आत्महत्ये प्रकरणी त्यांच्या भावाच्या तक्रारीवरुन त्यांचे पती गजानन जिरोनकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. शिल्पा यांना हुंड्यासाठी सासरी त्रास दिला जात होता असे त्याच्या भावाने तक्रारीत म्हटले आहे. याच त्रासातून शिल्पाने बाथरुममधील शॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. (In Nanded, two women committed suicide by strangulation due to family reasons)
दुसऱ्या घटनेत शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या अनुपमा मापारे यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. अनुपमा यांचे पती दंतरोग तज्ज्ञ असून डॉ. सागर मापारे असे त्यांचे नाव आहे. मात्र अनुपमा यांनी आत्महत्या का केली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. पोलीस याबाबत सखोल तपास करीत आहेत.
नागपूरमध्ये पत्नी सोडून जाईल या भीतीने आत्महत्येचा प्रयत्न
पत्नी सोडून जाईल या भीतीने एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. पोलिसांच्या प्रसंगावधनामुळे या व्यक्तीचा जीव वाचला आहे. प्रदीप रघुवीर पटेल असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशचा आहे. प्रदीप आणि त्याची पत्नी दोघेही पळून येऊन नागपूरात एकत्र राहत होते. पत्नीच्या घरच्यांना याची माहिती मिळाल्यानंतर ते तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांना प्रदीपने लग्नाचा पुरावा मागितला. यामुळे आपली पत्नी आता आई-वडिलांसोबत आपल्याला सोडून निघून जाईल असे वाटल्याने प्रदीपने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याचे प्राण वाचले. (In Nanded, two women committed suicide by strangulation due to family reasons)
इतर बातम्या
खुलेआम दहशत माजवण्याचा प्रकार, रहिवाशावर जीवघेणा हल्ला! घणसोलीत काय चाललंय काय?
Surat Baby Beatened : मोलकरणीकडून 8 महिन्यांच्या मुलाला दीड तास अमानुष मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद