Sangli Crime : सांगलीत वाळू तस्करांची मुजोरी, चक्क महिला तहसिलदार यांच्या गाडीवरच घातली गाडी

| Updated on: Mar 15, 2022 | 6:15 PM

तहसिलदार माने या अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी रात्री पथकासह गेल्या होत्या. यावेळी आबानगर चौकात गस्त घालत असताना एक डंपर भरधाव वेगाने येत असल्याचे समजले. पथकाने त्याचा पाठलाग केला. तर अचानक डंपरने चकवा दिला. त्याच ठिकाणी थोडा वेळ गस्त घालत असताना मुंढेवाडीकडून भरधाव डंपर आला आणि तहसिलदार यांच्या गाडीवर डंपर घातला.

Sangli Crime : सांगलीत वाळू तस्करांची मुजोरी, चक्क महिला तहसिलदार यांच्या गाडीवरच घातली गाडी
सांगलीत वाळू तस्करांनी महिला तहसिलदार यांच्या गाडीवरच घातली गाडी
Follow us on

सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील तहसिलदारां (Tahsildar)च्या शासकीय वाहनांवर आटपाडी-मुढेवाडी रोडवर रात्री वाळू तस्करा (Sand Smuggler)कडून हल्ला करण्यात आला आहे. तहसिलदार माने यांच्या मोटारीवर डंपर घालून तहसिलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या वाळू तस्करीच्या मुजोरी वाढली आहे. सांगली जिल्ह्यात वाळू तस्करी फोफावली आहे. नदीमधून बेकायदा वाळू उपसा केला जात आहे. यासाठी आटपाडीच्या तहसिलदार धाडसी लेडी सिंघम बी. एस. माने यांनी यासाठी कारवाई सुरू केली आहे. याआधी अनेक कारवाया त्यांनी केल्या आहेत. तहसिलदार कार्यालयासमोर अनेक वाळूच्या गाड्या पडून आहेत. (In Sangli, the sand smuggler hit the vehicle of a woman tehsildar’s car)

अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेल्या होत्या तहसिलदार

तहसिलदार माने या अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी रात्री पथकासह गेल्या होत्या. यावेळी आबानगर चौकात गस्त घालत असताना एक डंपर भरधाव वेगाने येत असल्याचे समजले. पथकाने त्याचा पाठलाग केला. तर अचानक डंपरने चकवा दिला. त्याच ठिकाणी थोडा वेळ गस्त घालत असताना मुंढेवाडीकडून भरधाव डंपर आला आणि तहसिलदार यांच्या गाडीवर डंपर घातला. चालकाच्या प्रसंगावधानाने तहसिलदार आणि गाडीतील महसूल पथकाचे कर्मचारी सुखरूप आहेत. कोणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र डंपरच्या धडकेनंतर मोटारीचे दरवाजे डंपरमध्येच सापडल्याने तहसिलदार काही काळ मोटारीतच अडकून पडल्या होत्या. तर डंपरचालक पोलिसांच्या ताब्यात आहे.

आगेमोहोळच्या हल्ल्यात 13 जण जखमी, 3 जण गंभीर

वाशिम जिल्ह्यातील पोघात येथे आगे मधमाश्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात 13 मजुर जखमी झाले. यातील 3 जण गंभीर जखमी झाले. यामध्ये 5 महिला व 8 पुरूषांचा समावेश आहे. हे सर्व हमीद पाटील यांच्या शेतात हरभरा सोंगणीचे काम करित असतांना शेतमालक जे जेवण करण्यासाठी बांधावरील झाडाखाली बसले तेव्हा अचानक झाडावर असलेल्या आगे मधमाश्यांनी अचानक हल्ला चढविला यासोबतच हरभरा सोंगणीचे काम करणाऱ्या मजुरांवर देखील हल्ला केला. यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले. (In Sangli, the sand smuggler hit the vehicle of a woman tehsildar’s car)

इतर बातम्या

Aurangabad : भाजप आमदार अतुल सावेंसह 23 जणांवर गुन्हे दाखल, फडणवीसांच्या नोटीसीविरोधातील आंदोलन भोवले

प्रेमचा असाही अंत, आधी तिच्या पैशांवर कमाई अन् शेवटी जीव जाईपर्यंत मारहाण, काय घडलं औरंगाबादेत?