Vasai Crime : 100 रुपये पडले सांगितले अन् दीड लाख लुटले, वाचा वसईत नेमके काय घडले ?

वसई एव्हरशाईन येथे राहणारे अंकुश सुतार हे दुपारी बँकेतून घरी येत होते. सुतार हे पेशाने इलेक्ट्रिशियन आहेत. शनिवारी दुपारी दीड लाखाचा चेक बँकेत वटवून रोकड घेऊन ते घरी परतत होते. मागून दुसऱ्या मोटरसायकलवरुन आलेल्या दोघे जण सुतार यांच्या गाडीजवळ येऊन पैसे असलेली लाल रंगाची पिशवी घेऊन फरार झाले.

Vasai Crime : 100 रुपये पडले सांगितले अन् दीड लाख लुटले, वाचा वसईत नेमके काय घडले ?
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 10:49 PM

वसई : 100 रुपयांच्या नोटा रस्त्यावर पडल्या आहेत असे सांगून, एका व्यक्तीची दीड लाख रुपयांची रोख(Cash) रकम घेऊन चोरटे फरार झाल्याची घटना वसईच्या एव्हरशाईन(Evershine) परिसरात घडली आहे. ही घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास एव्हरशाईन सिंग्नलवर घडली. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून, वालीव गुन्हे गुन्हे प्रकटीकरण आणि गुन्हे शाखा 02 वसई युनिट असे दोन पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना केले आहेत. अंकुश सुतार असे लुटण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. लुटीची ही घटना सिग्नलवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (In Vasai, thieves looted Rs 1.5 lakh from an electrician, the incident was captured on CCTV)

पैसे रस्त्यात पडल्याचे सांगून लक्ष वेधले आणि पैसे लुटले

वसई एव्हरशाईन येथे राहणारे अंकुश सुतार हे दुपारी बँकेतून घरी येत होते. सुतार हे पेशाने इलेक्ट्रिशियन आहेत. शनिवारी दुपारी दीड लाखाचा चेक बँकेत वटवून रोकड घेऊन ते घरी परतत होते. सुतार हे एव्हरशाईन सिग्नलला पोहताच मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी एक जण त्यांच्या गाडीजवळ आला आणि त्याने 100 रुपयाच्या चार नोटा रस्त्यात टाकून तुमचे पैसे पडल्याचे सांगितले. यानंतर ते दोघेही निघून गेले. मागून दुसऱ्या मोटरसायकलवरुन आलेल्या दोघे जण सुतार यांच्या गाडीजवळ येऊन पैसे असलेली लाल रंगाची पिशवी घेऊन फरार झाले. या घटनेतील दोन मोटरसायकल आणि त्यावरील चार आरोपी घटनास्थळावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. सीसीटीव्ही सहाय्याने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

डोंबिवलीत बनावट चेक वटवण्याचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद

डोंबिवलीत 24 कोटींचा बनावट चेक वटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला मानपाडा पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीने आतापर्यंत विविध घटनेत 10 कोटींचा गंडा घातला आहे. डोंबिवली पूर्वेतील एचएफसी बँकेत बनावट चेक वटवण्यासाठी आलेल्या तिघांच्या हालचाली बँक मॅनेजरला संशयास्पद वाटल्याने त्यांनी मानपाडा पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ बँकेत दाखल होत तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता बनावट चेकचा भांडाफोड झाला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकून नऊ जणांना अटक केली आहे. (In Vasai, thieves looted Rs 1.5 lakh from an electrician, the incident was captured on CCTV)

इतर बातम्या

Nanded Suicide : नांदेडमध्ये दुहेरी आत्महत्या, कौटुंबिक कारणातून गळफास घेत दोन महिलांनी जीवन संपवले

Surat Baby Beatened : मोलकरणीकडून 8 महिन्यांच्या मुलाला दीड तास अमानुष मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.