पती डॉक्टर, दोन मुली, ITच्या रडारवर अजित पवार यांची बहीण, विजया पाटील नेमकं काय करतात ? जाणून घ्या सर्व काही

विजया पाटील यांच्यावर आयकर विभागाच्या माध्यमातून कारवाई केली जात असल्यामुळे त्या नेमक्या कोण आहेत. त्यांचा व्यवसाय काय आहे ? त्यांच्यावर आयटी विभागाने कारवाईचा बडगा का उगारला आहे असे प्रश्न विचारले जात आहेत.

पती डॉक्टर, दोन मुली, ITच्या रडारवर अजित पवार यांची बहीण, विजया पाटील नेमकं काय करतात ? जाणून घ्या सर्व काही
vijaya patil ajit pawar
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 6:47 PM

कोल्हापू : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या कंपन्यांवर आयकर विभागानं कालपासून (7 सप्टेंबर) छापासत्र सुरू केलंय. यामध्ये अजित पवार यांच्या कोल्हापूर येथील त्यांच्या भगिनी विजया पाटील यांचे घर आणि कार्यालयाचाही समावेश आहे. विजया पाटील यांच्यावर आयकर विभागाच्या माध्यमातून कारवाई केली जात असल्यामुळे त्या नेमक्या कोण आहेत. त्यांचा व्यवसाय काय आहे ? त्यांच्यावर आयटी विभागाने कारवाईचा बडगा का उगारला आहे असे प्रश्न विचारले जात आहेत.

विजया पाटील अजित पवार यांची बहीण

अजित पवार यांचे काही निकटवर्तीय सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. विशेषतः त्यांचा मुलगा आणि बहीण अशा जवळच्या नातेवाईकांवर आयकर विभागाने कालपासून छापासत्र सुरू केलंय. या कारवाईत विजया पाटील यांचादेखील समावेश आहे. विजया पाटील या अजित पवार यांच्या सख्ख्या बहीण आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्या कोल्हापुरात वास्तव्याला आहेत. विजया पाटील यांचा एक प्रकाशनाचा व्यवसाय आहे.

विजया पाटील यांचे पती डॉक्टर

तर विजया पाटील यांचे पती डॉ. मोहन पाटील हे प्रख्यात भूलतज्ञ आहेत. विजया पाटील या मुक्ता पब्लिकेशनच्या माध्यमातून शैक्षणिक पुस्तके, पोस्टकार्ड, ग्रीटिंग कार्ड यांचे प्रकाशन करतात. ही प्रकाशन संस्था 2005 साली स्थापन करण्यात आलेली आहे. प्रकाशनाच्या क्षेत्रात काम करणारी ही महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाची संस्था आहे.

सकाळ समूहाच्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी पार पाडली

विजया पाटील यांनी काही काळ सकाळ समूहाच्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी पार पडलेली आहे. त्यानंतर मात्र विजया मुक्ता पब्लिकेशनच्या कामात पूर्णतः गुंतल्या. विजया पाटील यांना दोन मुली असून दोघीही विवाहित आहेत. कोल्हापूर जवळील पिरवाडी येथे असलेल्या फार्म हाऊसमध्येच त्या गेल्या काही वर्षापासून वास्तव्यास आहेत.

विजया पाटील शांत, मितभाषी

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार किंवा अजित पवार जेव्हा कधी कोल्हापूरला येतात तेव्हा ते विजया पाटील यांच्या घरी नक्की भेट देतात. पवार कुटुंबियांचा संस्कार असलेल्या विजया पाटील शांत आणि मितभाषी आहेत. मात्र कामाच्या बाबतीत त्या तितक्याच कडक आणि नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या आहेत. पवार कुटूंबात एखादं कौटुंबिक वादळ आल्यास त्या सावरण्यासाठी देखील विजया पाटील यांचा पुढाकार असतो.

इतर बातम्या :

MPSC Exam: मोठी बातमी, राज्य सेवा परीक्षेच्या 100 जागा वाढवल्या, एमपीएसीकडून नवं परिपत्रक जाहीर

Aryan Khan Case: शाहरुखच्या पोराचा जामीन अर्ज फेटाळला, आता 14 दिवस न्यायालयीन कोठडीत काढावे लागणार? पर्याय काय आहेत?

Pune new guidelines : कॉलेज, हॉटेल ते नाट्यगृह, पुण्यासाठी नवे नियम काय?

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.