Krishna River : कृष्णा नदीच्या पूर पातळीत वाढ, पुण्याहून NDRF च्या 2 टीम सांगलीत दाखल, 44 जवान सज्ज

सांगलीत कृष्णा नदीच्या पात्रात पुन्हा स्टंटबाजी सुरू झाली आहे. आयुर्विन पुलावरून नदीत उंचावरून उड्या मारल्या जात आहेत.

Krishna River : कृष्णा नदीच्या पूर पातळीत वाढ, पुण्याहून NDRF च्या 2 टीम सांगलीत दाखल, 44 जवान सज्ज
पुण्याहून एनडीआरएफच्या 2 टीम सांगलीत दाखलImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 7:02 PM

सांगली : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सतत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या 2 टीम पुण्याहून सांगलीत दाखल झाल्या आहेत. एनडीआरफचे अधिकारी सारंग कुर्वे आणि जवान कृष्णा नदीवर सध्या पाहणी करत आहेत. अप्पर तहसीलदार अर्चना पाटील (Archana Patil) यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली. आता सांगली मिरजेत एक टीम आणि दुसरी टीम आस्था इस्लामपूर (Islampur) येथे दाखल झाली आहे. या 2 टीम मध्ये 44 जवान सज्ज आहेत. सध्या सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी पोहचली 30 फुटावर गेली आहे. अलमट्टीमधून सव्वादोन लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केल्याने सांगलीला थोडासा दिलासा मिळाला. मात्र येत्या 2 दिवसात पाणी पातळी वाढू शकते. जिल्ह्यातील तीन पूल आणि तेरा बंधारे पाण्याखाली आलेत. मात्र कोयना धरणातून (Koyna Dam) नदीपात्रात एकूण 10 हजार 100 क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ

कृष्णा नदीच्या पात्रात पुन्हा स्टंटबाजी सुरू

सांगलीत कृष्णा नदीच्या पात्रात पुन्हा स्टंटबाजी सुरू झाली आहे. आयुर्विन पुलावरून नदीत उंचावरून उड्या मारल्या जात आहेत. मागील काही वर्षांपासून कृष्णेची पाणी पातळी वाढली की, अशा उड्या मारण्याचा प्रकार सुरू होत असतात. सांगली शहराजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 30 फूट झाली आहे. यंदा ही अशा उंचीवरून उड्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कोणताही अनर्थ घटना होण्याअगोदर पोलीस आणि प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या नदीमध्ये उड्या मारण्याचे अनेक प्रकार आहेत. विमान उडी, सूर उडी, गठ्ठा उडी, असे अनेक प्रकार पट्टीचे पोहणारे मारत असतात. या उड्या मारताना पाहताना नागरिक चांगलीच गर्दी करतात.

हे सुद्धा वाचा

दत्त मंदिरात कृष्णा नदीचे शिरले पाणी

कोयना आणि वारणा धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळं कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. सांगलीत आयुर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 30 फूट इतकी झाली आहे. तर कृष्णा नदीच्या काठावर असणाऱ्या औदुंबर येथील दत्त मंदिरात कृष्णा नदीच पाणी शिरले आहे. उत्सव मूर्ती ह्या मंदिरातून वरील देवघरात हलविण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी पूजा अर्चा सुरू करण्यात आली आहे.

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.