Vikhe Patil on NCP : विखे पाटलांचा राष्ट्रवादीला टोला, वाचाळपणाला संमती असणं दुर्दैवी
वाटेल त्या पद्धतीनं वाटाळपणा सुरू होता. त्यापैकी एक मिटकरी आहेत. परंतु, त्यांच्या पक्षश्रेष्ठींना याची दखल घेणे गरजेचे आहे. पक्षनेतृत्व दखल घेत नसतील, तर हे सर्व दुर्दैवी असल्याचं विखे पाटील म्हणाले.
अकोला : पशुसंवर्धन व महसूलमंत्री (Revenue Minister) आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी लम्पी रोगाच्या विळख्यात असलेल्या जनावरांची पाहणी केली. त्यानंतर परत जाताना ते पत्रकारांशी बोलले. अमोल मिटकर यांच्यावर गंभीर होत आहेत. कमिशनखोरीचा आरोप त्यांच्याच पक्षातील काही जणांनी लावला. यावर विखे पाटील म्हणाले, अमोल मिटकरी यांच्या विरोधातील आरोप फार गंभीर आहेत. सरकार त्याची कसून चौकशी करील. या लोकशाहीमध्ये (Democracy) वाचाळपणा करण उचित नाही. मिटकरी हे अतिशय वाचाळ आहेत. यासंदर्भात त्यांच्या पक्षाच्या नेत्याने विचार केला पाहिजे.मिटकरींसारख्या अशा बेलगाम लोकांमुळं पक्ष बदनाम होतो. पक्षाचं नेतृत्व बदनाम होतं. पक्षाच्या नेतृवाची त्याला संमती असेल तर हे दुर्दैव आहे. असा टोलाही यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मिटकरींवरून राष्ट्रवादीला (NCP ) लगावला आहे.
अमोल मिटकरींवर आरोप काय
अमोल मिटकरी हे त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून कमिशन घेतात. असा आरोप राष्ट्रवादीच्या मेळाव्यात लावण्यात आला. त्यावर आरोप करणाऱ्यावरच प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर भाजपनं या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचं सरकार असताना काही लोकांना तारतम्य राहत नव्हतं. वाटेल त्या पद्धतीनं वाटाळपणा सुरू होता. त्यापैकी एक मिटकरी आहेत. परंतु, त्यांच्या पक्षश्रेष्ठींना याची दखल घेणे गरजेचे आहे. पक्षनेतृत्व दखल घेत नसतील, तर हे सर्व दुर्दैवी असल्याचं विखे पाटील म्हणाले. कोणताही मोठा पक्ष अशा वाचाळ लोकांमुळं बदनाम होतो. त्यामुळं अशांवर वेळीच अंकूश लावणे आवश्यक आहे. अन्यथा पक्ष बदनाम होत असतो. परंतु, पक्षनेतृत्वानं याची दखल घेणे आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.