VIDEO | हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले, रात्री पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता, सतर्कतेचा इशारा

मध्यप्रदेश आणि विदर्भात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणात पाण्याचा साठा वाढला आहे. यामुळे हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे.

VIDEO | हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले, रात्री पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता, सतर्कतेचा इशारा
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 11:11 PM

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे. मध्यप्रदेश आणि विदर्भात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणात पाण्याचा साठा वाढला आहे. यामुळे हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

रात्री पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता

जळगावच्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहेत. सततच्या पावसामुळे हतनूर धरण हे पूर्ण भरले आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज (22 जुलै) रात्री 9 च्या सुमारास तापी नदीपात्रात 1,06,122 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. पाण्याचा वाढता प्रवाह लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नदीपात्रात गुरेढोरे न सोडण्याचे आवाहन 

गेल्या काही तासांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हतनूर धरणाच्या लगतच्या गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये. तसेच कोणीही नदी पात्रामध्ये जाऊ नये, असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

पाण्याचा प्रवाह लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये आणि नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग 

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण आहे. या धरणातून भुसावळ तालुक्यासह रेल्वे, वरणगाव आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्रांला पाणीपुरवठा केला जातो. तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, यावल, सावदा मोठ्या पालिका आणि बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर एमआयडीसी यांसह तब्बल 130 गावांना पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची पाणी पातळी 209.190 मीटर इतकी आहे.

पाहा व्हिडीओ :

(Jalgaon hatnur dam overflow 41 gates opened due to heavy rainfall Alert)

संंबंधित बातम्या : 

Video : मध्यप्रदेशसह विदर्भात पावसाची बॅटिंग, हतनूर धरणाच्या 16 दरवाज्यातून दुसऱ्या दिवशी विसर्ग सुरु

VIDEO | जळगावात तुफान पाऊस, हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडले

नांदेडमध्ये ढगफुटी, कोकणतल्या नद्यांना पूर, जळगावात हतनूरमधून पाण्याचा विसर्ग, राज्यात पावसाची स्थिती कशी?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.