जळगावच्या लोहारा ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार, माजी सरपंचांकडून 432 लोकांना बनावट उताऱ्यांचं वाटप, विद्यमान सत्ताधाऱ्यांचा आरोप
ग्रामसभेच्या प्रोसेडिंग बुकमध्ये बनावट ठराव टाकून गावठाण जमिनीचे मालकी हक्क दाखवणारे नमुना नंबर 8 चे सात बारा उतारे तयार करून ग्रामस्थांकडून देऊन कोट्यवधीं रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे प्रकार समोर आला आहे.
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारा ग्रामपंचायतीत मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. पदावर असतांना सरपंच ,उपसरपंच , ग्रामसेवकांनी ग्रामसभेच्या प्रोसेडिंग बुकमध्ये बनावट ठराव टाकून गावठाण जमिनीचे मालकी हक्क दाखवणारे नमुना नंबर 8 चे सात बारा उतारे तयार करून ग्रामस्थांकडून देऊन कोट्यवधीं रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे प्रकार समोर आला आहे. विद्यमान सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागितल्यावर हा मोठा घोटाळा उघडकीस आला.
432 लोकांची फसवणूक
ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण जागा कोणालाही देता येत नाही. सात बारा उतारा ही देता येत नाही, अस असताना लोहारा ग्रामपंचायत चे माजी सरपंच आणि ग्रामवसेवकान बनावट दाखले तयार केले. त्यात सही शिक्का मारून लोकांना सर्रास दाखले देण्यात आले. हे दाखले एक दोन लोकांना नाही तर तब्बल 432 लोकांना हे दाखले देण्यात आले.
निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी आमिष
ग्रामपंचायत निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी गावठाणातील जमिनीवर बांधण्यात आलेली घरं कायमची नावांवर करून सात-बारा देण्याचं आमिष तत्कालीन सरपंच आणि उपसरपंच यांनी गावकऱ्यांना दिल होतं. त्यानुसार तत्कालीन सरपंच मालतीबाई संजय पाटील, उपसरपंच कैलास संतोष चौधरी यांनी 432 ग्रामस्थांकडून पैसे घेऊन घरी जाऊन वार्ड निहाय बनावट सातबारा दिला, असा आरोप सध्याचे सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांनी केला आहे. निवडणूक संपल्यावर लाभार्थी ग्रामस्थ ज्यावेळी नवा सात बारा उतारा घेण्यासाठी आले त्यावेळी हा दाखला बनावट असल्याचं लक्षात आलं. गावठाण जमिनीचा सात बारा उतारा देण्याचा कुठलाही आदेश सरकार कडून नसल्याचं सांगण्यात आलं. आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
तत्कालीन सरपंच, उपसरपंचासह ग्रामविकास अधिकाऱ्यावर आरोप
सातबारा उतारा घेणाऱ्या ग्रामस्थांनी नविन सरपंच यांना भेटून हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर विद्यमान सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागितल्यावर हा मोठा घोटाळा उघडकीस आला. गावातील 432 लोकांची फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं. 2019 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर ग्रामसभा घेऊन तत्कालीन सरपंच मालतीबाई संजय पाटील, उपसरपंच कैलास संतोष चौधरी यांनी ग्रामविकास अधिकारी आर टी बैसाणे यांनी संगनमत करून नामुना नंबर 8 चे बनावट उतारे 7/ 12 तयार करून वाटप करून मोठा भ्रष्टाचार केल्याचं उघड झाले. या प्रकरणी तत्कालीन सरपंच , उपसरपंच , ग्रामविकास अधिकारी यांच्या सह अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, विद्यमान सरपंचांनी केलेल्या आरोपांवर माजी सत्ताधाऱ्यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही.
इतर बातम्या:
‘माफी मागा, अन्यथा मानहानीचा दावा दाखल करणार’, संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांना नोटीस
Jalgaon Pachora Lohara Grampanchayat ex Sarpanch and ex village development officer gave duplicate land records to people alleged by present sarpanch Akshay Kumar Jaiswal