Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jayant Patil : जयंत पाटलांचा भाजपला टोला, मागच्या पिढीनं काहीच केलं नाही असं कसं म्हणता?

आपल्या देशात टाचणी तयार होत नव्हती. आता आयआयटी, आयआयएमसारख्या संस्था उभ्या आहेत. या संस्था या जुन्या नेत्यांनी तयार केल्या. गुगल, अॅपल याठिकाणी प्रमुख म्हणून भारतीय व्यक्ती आहेत.

Jayant Patil : जयंत पाटलांचा भाजपला टोला, मागच्या पिढीनं काहीच केलं नाही असं कसं म्हणता?
जयंत पाटलांचा भाजपला टोलाImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 10:00 PM

अकोला : मागच्या पिढीचा आपण नेहमी आदर ठेवला पाहिजे. परंतु आता मागच्या पिढीचा अनादर करण्याची प्रथा प्रवृत्ती वाढलीय. मागील पिढीने काहीच केलं नाही, असं सांगण्याची प्रथा आता अलीकडच्या काळात सुरु झालीय. असा टोला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी लगावला. ते अकोल्यातील मुर्तीजापूरमध्ये (Murtijapur) आयोजित सहकार नेते तथा माजी आमदार भय्यासाहेब तिडके (Bhaiyasaheb Tidke) यांच्या 75 व्या अमृत महोत्सव (Amrit Mahotsav) सोहळ्यात बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की जगाच्या कोणत्याही देशाचा ऱ्हास कधी सुरु होतो. जेव्हा आपण मागच्या पिढीने केलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्याला सुरुवात करतोय. तेव्हा त्या पिढीचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते.

तेव्हाच्या कष्टाचं फळ आता मिळते

जयंत पाटील म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्या देशात टाचणी तयार होत नव्हती. आता आयआयटी, आयआयएमसारख्या संस्था उभ्या आहेत. या संस्था या जुन्या नेत्यांनी तयार केल्या. गुगल, अॅपल याठिकाणी प्रमुख म्हणून भारतीय व्यक्ती आहेत. जगाच्या पाठीवरील सर्वोत्तम कंपन्यांमध्ये भारतीय तरुण प्रमुख स्थानी आहेत. कारण पंडित जवाहरलाल नेहरुंनी त्याकाळात आयआयएम तयार केल्या होत्या. हा तुमच्या माझ्यासाठी अभिमानाचा दिवस आहे. तेव्हा केलेल्या कष्टाचे फळ आता मिळते आहे.

देशाच्या विकासाची पायाभरणी नेहरुंनी केली

जयंत पाटील यांनी सांगितलं की, भारत मंगळापर्यंत पोहचला. त्याचा पाया तेव्हा घातला गेला. 1971 साली चंद्रावर अमेरिकेनं यान पाठविलं. निल आल्मस्ट्रांग चंद्रावर उतरला. त्यावर एक सिनेमा आला. चंद्रावर काय होतं, हे बघण्याची इच्छा मोठी होती. इस्रोसारखी संस्था होमी भाभा यांना पुढं करून जवाहरलाल नेहरु यांनी सुरू केली. इस्त्रोमधून तयार होऊन लोकं चंद्रापर्यंत गेले. जवाहरलाल नेहरु यांनी खऱ्या अर्थानं देशाच्या विकासाची पायभरणी केली, याची आठवणी जयंत पाटील यांनी करून दिली.

हे सुद्धा वाचा

तर तुमच्या जेवणाची व्यवस्था केली असती…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावती ग्रामीण आढावा बैठक जयंत पाटील यांनी घेतली. यावेळी ते म्हणाले, आजचा महत्वाचा दिवस आहे. पोळ्याचा पाडवा, आहे असं जिल्हाध्यक्ष सांगत होते. श्रावण संपल्यानंतर आजचा पहिला दिवस आहे. श्रावणामधील पथ्य मोडायची संधी होती. पण आज तुमच्यावर अन्याय झाला. मी जर जिल्हाध्यक्ष असतो तर तुमची इथंच कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था केली असती. यावर बैठकीत एकच हशा पिकला.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.